Mpox Virus | मंकीपॉक्सची लागण टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक उपायांची सूचना
Mpox virus spreading fast, WHO raises alert
‘मंकीपॉक्स’ या विषाणूजन्य संसर्गाचा जगात वेगाने फैलाव. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आशिष शिंदे

जगभरात सध्या मंकीपॉक्समुळे भीती निर्माण झाली आहे. मंकीपॉक्स आजाराचा संसर्ग वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागाने कोल्हापूरसह सर्व जिल्हा प्रशासनांना सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

Mpox virus spreading fast, WHO raises alert
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, २६ ऑगस्‍ट २०२४

मात्र, मंकीपॉक्सला घाबरण्याचे कारण नाही, केवळ खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

काय आहे मंकीपॉक्स ?

मंकीपॉक्स आजार ओर्थोपोक्स डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. मंकीपॉक्स प्राण्यांपासून होणारा संसर्गजन्य आजार असला तरी प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार आहे.

खार, उंदीर, माकडाच्या विविध प्रजातींसह इतर प्राण्यांमध्ये या आजाराचे विषाणू आढळले आहेत. काही प्रकारच्या स्वारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो.

लक्षणे काय आहेत?

रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. सुरुवातीला शरीरावर पुरळ उठण्यास सुरुवात होते.

पुरळ उठण्याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. यामुळे जखमा होऊ शकतात. पू झाल्यानंतर जखम वाढून त्यात खड्डा पडतो.

Mpox virus spreading fast, WHO raises alert
सिंधुदुर्ग : मामा वरेरकर नाट्यगृहात कलाकारांवर ‘जलधारा’!

असा होतो संसर्ग...

रक्त, शारीरिक द्रव किंवा संक्रमित प्राण्यांच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू प्राण्यांमधून थेट मानवामध्ये पसरू शकतो. याव्यतिरिक्त एकापेक्षा अधिक पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवल्याने,

डोळे, श्वसनसंस्था, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकीपॉक्स प्रवेश करतो, याशिवाय संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे आणि टॉवेल यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्यानेदेखील मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता असते.

मंकीपॉक्स आजाराबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. जिल्हा आरोग्य विभागातर्फे सर्व आरोग्य यंत्रणांना स्क्रीनिंगच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विलगीकरण कक्षही तयार आहे.

- डॉ. संजय रणवीर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news