live in partner Murder File photo
राष्ट्रीय

live in partner Murder: काय म्हणावं! एकाशी लग्न, दुसऱ्याशी लिव्ह-इनमध्ये; तिसरा भेटताच अभिनेत्रीने केली पार्टनरची हत्या!

एका अभिनेत्रीने आपल्या नवीन प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने 'लिव्ह-इन पार्टनर'ची गळा दाबून आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

live in partner Murder

बेंगळुरू: एका अभिनेत्रीने आपल्या नवीन प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने 'लिव्ह-इन पार्टनर'ची गळा दाबून आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये उघडकीस आली आहे. उत्तर-पश्चिम बेंगळुरूच्या बागलकुंठे भागातील विजयलक्ष्मी लेआउटमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री उर्वशी ऊर्फ बिंदू (वय २६), तिचा प्रियकर विनय कुमार (वय २६) आणि त्याचा साथीदार धनुष (वय २४) यांना अटक केली आहे. मोहन कृष्णा (वय २९) असे मृत तरुणाचे नाव असून तो पिग्मी कलेक्टर आणि फायनान्सर म्हणून काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बिंदू आणि मोहन कृष्णा गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगून बागलकुंठे येथे भाड्याने घर घेतले होते. मात्र ते दोघेही विवाहित असून आपापल्या जोडीदारांपासून वेगळे झाले होते. बिंदूने काही कन्नड चित्रपट आणि मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.

हत्या का केली?

बिंदूचे याच दरम्यान विनय कुमार नावाच्या ट्रक ड्रायव्हरशी प्रेमसंबंध जुळले. तिला विनयशी लग्न करायचे होते, मात्र मोहन कृष्णाचा याला तीव्र विरोध होता. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. अखेर मोहन कृष्णाला वाटेतून दूर करण्यासाठी बिंदू आणि विनयने हत्येचा कट रचला. यात त्यांनी हॉटेल व्यवसायात आर्थिक नुकसान झालेल्या धनुषला पैशांचे आमिष दाखवून सामील करून घेतले.

शनिवारी रात्री त्यांनी मोहन कृष्णाला एका निर्जन ठिकाणी पार्टीसाठी बोलावले. भरपूर दारू पिल्यानंतर, आरोपींनी त्याचे तोंड टेपने बंद केले जेणेकरून तो ओरडू शकणार नाही. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली आणि तिथून पळ काढला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT