Abhishek Banerjee Office pudhari
राष्ट्रीय

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या कार्यालयावर चालवला बुलडोजर... मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Anirudha Sankpal

Abhishek Banerjee Office Demolished: तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे अमताला येथील कार्यालयावर आज बुल्डोजर चालवण्यात आला. जिल्हा प्रशासनाने ही पाच मजली इमारत कोणत्याही परवानगीशिवाय आणि बांधकाम नियांचे उल्लंघ करून बांधल्याचा आरोप केला आहे.

मोठ्या पोलीस बंदोबस्तात बुलडोजरच्या सहाय्याने ही करावाई करण्यात आली, यासाठी बंगाल पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस फोर्स यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर अग्निशमन अन् आपत्कालीन विभागाचे देखील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.

अभिषेक बॅनर्जी यांच्याशी निगडीत हे कार्यालय अमताला इथं आहे. हे कार्यालय बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बग लोकसभा मतकदर संघात येतं. दरम्यान, ज्यावेळी ही इमारत पाडण्यात येत होती त्यावेळी भाजप कार्यकर्ते आजूबाजूला जमा झाले होते. त्यांनी जल्लोष साजरा करत पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली.

अमतालाचे भाजप आमदार अग्निश्वर नासक यांनी सरकारच्या या कारवाईचे स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, 'ही इमारत अनधिकृतरित्या बांधील होती आणि प्रशासनाने शेवटी यावर कारवाई केली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आमच्याकडे या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती. आम्ही याबाबत संबंधित व्यक्तींना नोटिस पाठवूली होती. त्यांना सुनावणीवेळी हजर राहण्यास देखील सांगितलं होतं.

"प्रशासनाने कायद्यातील तरतुदींनुसारच कार्यवाही सुरू केली आहे. कथित अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नोटीस बजावण्यात आल्या होत्या आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पुढील कोणतीही कार्यवाही सुनावणीनंतर आणि संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन करूनच केली जाईल," अशी माहिती दक्षिण २४ परगणा जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय (PTI) ला दिली.

शनिवारी सकाळपासूनच पक्ष कार्यालयाभोवती अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. परिसराभोवती बॅरिकेड्स (guardrails) लावण्यात आले असून वरिष्ठ पोलीस आणि नागरी प्रशासन अधिकारी या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.

"ही कार्यवाही शांततेत आणि कायद्यानुसार पार पाडली जाईल, याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. पाडकामाचे काम पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेच्या आधारावरच केले जात आहे," असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT