Abhijeet Dipke Marriage Pudhari
राष्ट्रीय

Abhijeet Dipke Marriage: अभिजीत दीपके लग्नबंधनात अडकणार? आईने सांगितलं कशी हवी सून? आंदोलनानंतर येत आहेत प्रस्ताव

Abhijeet Dipke Marriage: जंतर-मंतर आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांच्या लग्नासाठी अनेक विवाह प्रस्ताव येत असल्याची माहिती त्यांच्या आईने दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Abhijeet Dipke Marriage: जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर अभिजीत दीपके हे देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. आंदोलनानंतर त्यांची युवा नेता म्हणून ओळख अधिक मजबूत झाली असून, आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांना लग्नासाठी अनेक विवाह प्रस्ताव येत असल्याची माहिती त्यांच्या आईने दिली आहे.

आंदोलनानंतर येत आहे अनेक प्रस्ताव

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांना लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांच्या आईने हसत उत्तर देताना सांगितले की, आंदोलन यशस्वी झाल्यानंतर लग्नासाठी अनेक ठिकाणांहून फोन येऊ लागले आहेत. त्यांनी सांगितले की, यापूर्वीही काही विवाह प्रस्ताव येत होते, मात्र आंदोलनानंतर त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.

'आधी त्याला सावरू द्या'

अभिजीत दीपके यांचे लग्न नेमके कधी होणार, या प्रश्नावर त्यांच्या आई म्हणाल्या की, सध्या त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. आंदोलनानंतरच्या घडामोडींमधून त्याला आधी बाहेर येऊ द्यावे. योग्य वेळ आल्यावर लग्नाबाबत निर्णय घेतला जाईल.

कशी हवी सून?

भावी सुनेबाबत विचारले असता अभिजीत दीपके यांच्या आईने आपल्या विचारांमध्ये झालेला बदलही स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, "पूर्वी मला साधी, सरळ स्वभावाची सून हवी असे वाटायचे.

पण आता अभिजीत ज्या टप्प्यावर पोहोचला आहे, त्यानंतर त्याने आपल्या आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडावा, असे आम्हाला वाटते. आम्ही त्याच्या निर्णयाचा पूर्ण आदर करू." आजच्या काळात मुलांनी स्वतःचा जोडीदार निवडणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोण आहेत अभिजीत दीपके?

अभिजीत दीपके हे कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. सोशल मीडियावरील एका मोहिमेद्वारे ते चर्चेत आले. त्यानंतर NEET पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन उभारले.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या या आंदोलनात देशभरातील हजारो युवक सहभागी झाले होते. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे आंदोलनाचे प्रमुख होते. त्यांनी अनेक दिवस उपोषण केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

वैयक्तिक आयुष्यही चर्चेत

अभिजीत दीपके यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असताना आता त्यांच्या लग्नाबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या आईच्या वक्तव्यानुसार लग्नाचा अंतिम निर्णय अभिजीत दीपके स्वतः घेणार असून, कुटुंब त्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT