Aadhaar Update file photo
राष्ट्रीय

Aadhaar Update: आधार कार्डमधील मोबाईल नंबर चुकलाय की बंद झालाय? आता घरातून ५ मिनिटांत करा अपडेट; सर्वात सोपी पद्धत

Aadhaar mobile number update: आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बरोबर आणि सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार सेवा केंद्रावर जावे लागत होते. मात्र आता घरबसल्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा मिळणार आहे.

मोहन कारंडे

Aadhaar mobile number update

नवी दिल्ली : आधार कार्ड आज केवळ ओळखपत्र राहिले नसून बँक, मोबाईल, UPI, सरकारी योजना आणि अनेक डिजिटल सेवांची गुरुकिल्ली बनले आहे. त्यामुळे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बरोबर आणि सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, आतापर्यंत मोबाईल नंबर बदलण्यासाठी लोकांना आधार सेवा केंद्रावर जावे लागत होते. मात्र आता UIDAI ने आधार ॲपमध्ये मोठी अपडेट केली आहे. या नवीन अपडेटद्वारे युजर्सना घरबसल्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा मिळणार आहे.

जुना मोबाईल नंबर बंद झाला असेल तर काय करावे?

डिजिटल इंडियाला पुढे नेण्याच्या दिशेने UIDAI चे हे पाऊल एक मोठा प्रयत्न मानले जात आहे. विशेषतः ज्यांचा जुना मोबाईल नंबर बंद झाला आहे किंवा ज्यांच्याकडे आता नवीन नंबर आहे, अशा लोकांसाठी ही सुविधा फायदेशीर ठरेल. आधार ॲपद्वारे मोबाईल नंबर कसा बदलायचा, त्यासाठी अटी काय आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या सविस्तर.

आधारमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा? Step-by-Step प्रक्रिया

Step 1: आधार ॲप डाउनलोड/अपडेट करा आणि लॉग इन करा

सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये UIDAI चे अधिकृत Aadhaar App डाउनलोड करा.

ॲप उघडल्यानंतर तुमचा आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी द्वारे लॉग-इन करा. लॉग-इनसाठी OTP व्हेरिफिकेशन केले जाईल.

Step 2: Update Aadhaar सेक्शन निवडा

ॲपमध्ये दिलेल्या Update Aadhaar किंवा Update Mobile Number या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका जो तुम्हाला आधारशी लिंक करायचा आहे.

Step 3: OTP व्हेरिफिकेशन आणि विनंती सबमिट करा

तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून नंबर व्हेरिफाय करा.

OTP व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमची विनंती UIDAI कडे पाठवली जाईल. काहीवेळा, अंतिम पडताळणीसाठी जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागू शकते.

मोबाईल नंबर अपडेट होण्यासाठी किती वेळ लागेल?

UIDAI नुसार, मोबाईल नंबर अपडेट होण्यासाठी ७ ते १० कार्यालयीन दिवसांचा वेळ लागू शकतो. एकदा अपडेट प्रक्रिया पूर्ण झाली की, तुम्हाला SMS द्वारे कळवले जाईल.

आधारशी मोबाईल नंबर लिंक नसल्यास काय होतं?

  • जर आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

  • तुम्ही OTP आधारित सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही (उदा. ई-KYC, ऑनलाइन आधार अपडेट, बँकिंग सुविधा).

  • सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येतील.

  • सुरक्षेच्या दृष्टीने मिळणारे अलर्ट्स आणि मेसेज मिळणार नाहीत, ज्यामुळे फसवणुकीचा धोका वाढू शकतो.

  • बँक खाते उघडणे, पॅन-आधार लिंक करणे आणि सबसिडी मिळवणे या प्रक्रिया रखडू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT