Aadhaar Card Update Pudhari
राष्ट्रीय

Aadhaar Card Update: तुमचं आधार कार्ड पुन्हा बदलणार! आता नाव, पत्ता दिसणार नाही; फक्त...

Aadhaar Card Update: आधार कार्डात मोठा बदल करण्याची UIDAIची तयारी असून आता कार्डावर नाव, पत्ता किंवा आधार क्रमांक दिसणार नाही. नव्या कार्डावर फक्त धारकाचा फोटो आणि QR कोड असेल.

Rahul Shelke

New Aadhaar Card: बँकेत खाते उघडणे, मोबाईल सिम घेणे किंवा सरकारी योजना असो, सगळीकडे आधार कार्ड गरजेचं आहे. पण आधारचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकार पुन्हा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. UIDAI म्हणजे आधार बनवणारी सरकारी संस्था आता नवं आधार कार्ड आणणार आहे. या कार्डवर तुमचं नाव, पत्ता किंवा आधार नंबर काहीही लिहिलेलं दिसणार नाही. कार्डावर फक्त तुमचा फोटो आणि एक QR कोड असेल. त्या QR कोडमध्ये तुमची सर्व माहिती सुरक्षित असेल.

UIDAI काय म्हणतंय?

UIDAIचे CEO भुवनेश कुमार यांनी सांगितलं की, अनेक ठिकाणी हॉटेल, PG, इव्हेंटमध्ये लोकांकडून आधारची फोटोकॉपी घेतली जाते यामुळे डेटा चोरी किंवा गैरवापर होण्याचा धोका असतो. म्हणूनच कार्डवर इतकी माहिती लिहिण्याची गरजच काय? फोटो आणि QR कोड पुरेसं आहे. UIDAI डिसेंबरमध्ये यासाठी नवा नियम आणू शकते.

नव्या आधार कार्डात काय असेल?

  • फक्त फोटो आणि QR कोड

  • नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार नंबर काहीही दिसणार नाही

  • QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणालाही माहिती कळणार नाही

  • माहिती एन्क्रिप्टेड (locked) स्वरूपात असेल

यामुळे तुमचे आधार कार्ड सुरक्षित राहील आणि त्याचा गैरवापर होणार नाही.

सध्याचे नियम का बदलले जात आहेत?

कायदा सांगतो की:

  • आधार नंबर किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन जमा करता येत नाही

  • पण अनेक ठिकाणी आधार कार्डची प्रत मागितली जाते आणि ती जतनही केली जाते

यामुळे लोकांचा डेटा चुकीच्या हातात जाण्याची शक्यता असते.

आधार व्हेरिफिकेशनसाठी महत्वाचे नियम

  • तुमची संमती नसताना आधार व्हेरिफाय करता येत नाही

  • नियम मोडल्यास 1 कोटी रुपये दंड लागू शकतो

  • OTP, फिंगरप्रिंट किंवा आयरिसद्वारेच तुमची संमती घेतली जाईल

  • फक्त UIDAI-अधिकृत संस्था किंवा बँकांनाच व्हेरिफिकेशनची परवानगी

  • तुम्ही तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT