Hyderabad Crime (file photo)
राष्ट्रीय

Hyderabad Crime | दहावीतल्या मुलाचं महिलेनं केलं लैंगिक शोषण, तब्येत बिघडल्यानंतर कळला सगळा प्रकार

मुलानं पालकांना नेमकं काय घडलं ते सांगितलं? ऐकून पोलीसही चक्रावले

दीपक दि. भांदिगरे

Hyderabad Crime

हैदराबाद : हैदराबादमधील एका उच्चभ्रू भागात एका घरात महिलेने १७ वर्षीय मुलाचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मुलगा आणि सदर महिला, दोघेही एकाच घरात घरकाम करतात. त्यांच्यात संमतीने संबंध निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्या मुलाची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. तो अस्वस्थ झाल्याचे आम्हाला दिसून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर किशोरवयीन मुलाने याबद्दल त्याच्या पालकांना नेमके काय घडले आहे ते सांगितले. यातून शेजारच्या एका महिलेने त्याचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याची गोष्ट समोर आली.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, "जेव्हा मुलाच्या पालकांना हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी तक्रार दाखल केली. हा पोक्सो कायद्याअंतर्गतचा गुन्हा आहे. या प्रकरणात मुलग्याची संमती असो वा नसो, हा एक गुन्हा असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल," असे पश्चिम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुलगा आणि ती महिला तसेच मुलाचे पालकही घरकाम करतात. मुलगा आणि महिलेची एकमेकांची चांगली ओळख आहे. ते घरी एकत्र काम करतात, असेही सांगण्यात आले. POCSO कलमांव्यतिरिक्त, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत येणाऱ्या कलमांचाही एफआयआरमध्ये समावेश केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मुलांना लैंगिक शोषण, गुन्हे वाढले

पोक्सो कायद्याअंतर्गत, १८ वर्षांखालील मुलांना लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि पोर्नोग्राफीपासून संरक्षण देण्यासाठी एक व्यापक कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. हैदराबाद शहर पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात POCSO अंतर्गत नोंद गुन्ह्यांची संख्या २०२३ मधील ३७१ प्रकरणांच्या तुलनेत ४४९ वर पोहोचली आहे. अशा प्रकरणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT