

Paithan Crime News
पैठण : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार असलेल्या आरोपीने पैठण येथे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहून तक्रारदार महिलेसमोर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पैठण पोलीस पथकाने अटक केली असून. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्यामुळे दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी होऊन खाजगी वाहनाची नुकसान झाली आहे.
अधिक माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार असलेल्या अंतोन श्यामसुंदर गायकवाड रा. नागापूर एमआयडीसी अहिल्यानगर या सराईत आरोपीने पैठण येथील नाथमंदिर परिसरातील नाथकृपा हॉटेल येथे वास्तव्यास असताना तक्रारदार महिलेसोबत आरोपीचा प्रेमसंबंध असल्याने आरोपी हद्दपार काळात लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिला होता.
या ठिकाणी तक्रारदार महिलेची चौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी राहायला होती. तक्रारदार महिला बाहेर गावाला गेल्यानंतर आरोपीने जून २०२४ ते दि. २२ फेब्रुवारी या दरम्यान घरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
या घटनेमुळे पीडित मुलीच्या आईने दि.२२ फेब्रुवारी रोजी सदरील सराईत हद्दपार आरोपी विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला केला होता. या फरार आरोपी विरुद्ध शोध मोहीम घेण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, यांनी नागापूर एमआयडीसी अहिल्यानगर येथे सापळा रचून पोलीस पथकाने पहाटे उसामध्ये लपून बसलेल्या हद्दपार आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड याला अटक केले.
अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून झटापट केल्यामुळे दोन पोलीस कर्मचारी सफौ सुधीर आव्हळे, पोना राजेंद्र जिवडे यांना हाताला किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड रा. नागापूर एमआयडीसी अहिल्यानगर यांनी बलात्कार पोस्को गुन्हा दाखल असताना पीडित मुलीच्या घरातील किमती ऐवजी व संसार उपयोगी वस्तू घरी कोणी नसताना चोरून नेल्याचा गुन्हा झिरो पद्धतीने पैठण पोलीस ठाण्यात दाखल असून यासह विविध पोलीस ठाण्यात जवळपास आठ ते नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.