पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल pudhari File Photo
राष्ट्रीय

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल

केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (दि.19) गुन्हा दाखल केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) खेडकर विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला. मर्यादेपेक्षा जास्त वेळा परिक्षा देऊन आय़ोगाची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच खोटी ओळख सांगितल्याप्रकरणी हा एफआयआर युपीएससीने नोंदवला. युपीएससीने खेडकरची झालेली निवड रद्द करण्यासाठी आणि भविष्यात परीक्षा न देण्यासाठी तिला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

पुजा विरोधातील युपीएससीच्या तक्रारीतील बाबी

  • पूजा खेडकरने मर्यादेपेक्षा जास्त वेळा परिक्षा दिली.

  • ओळख बदलून परिक्षा दिल्याचे युपीएससीने तक्रारीत म्हटले आहे.

  • स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, सही फोटो, ई-मेल बदलल्याचीही तक्रार

  • मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलून युपीएससीची फसवणूक केली.

युपीएससीने या प्रकरणी सखोल तपास करुन ही तक्रार दाखल केली आहे. युपीएससीने तक्रार नोंदवल्यावर दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजा खेडकरविरुद्ध बनावटगिरी, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

युपीएससीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिच्या गैरवर्तनाची सविस्तर आणि सखोल चौकशी केली. या तपासणीतून असे उघड झाले आहे की, तिने मर्यादेपेक्षा जास्त वेळा परिक्षा देऊन आयोगाची फसवणूक केली. तिचे नाव, तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव, तिचा फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून परीक्षेचे नियम तोडले.

तक्रारीत अपंगत्व, क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा उल्लेख नाही

पूजा खेडकर वादात सापडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अपंगत्वाचे प्रमाणपत्र हा मुद्दा महत्वाचा आहे. मात्र युपीएससीने खेडकर विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबद्दलचा आणि क्रिमीलेअर प्रमाणपत्राबद्दलचा उल्लेख नाही. फक्त ओळख बदलून आणि अनेकवेळा परिक्षा दिल्याचा उल्लेख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT