8th Pay Commission Update Pudhari
राष्ट्रीय

8th Pay Commission: बेसिक पगार ६९,००० रूपये; ३.८३ फिटमेंट फॅक्टर... रेंज पार ९.५७ लाखांपर्यंत; तुमचा पगार किती वाढणार?

Anirudha Sankpal

8th Pay Commission Government Salary Hike: आठवा वेतन आयोगाची टीम गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यात बैठका घेत आहेत. या बैठकांद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या जात आहेत. या अनुशंगाने एक रिपोर्ट तयार करून तो सरकारला देण्यात येणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या ठेवल्या असून त्यानुसार किमान मूळ वेतन हे ६९,००० रूपये आणि फिटमेंट फॅक्टर हा ३.८३ ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

फिटमेंट फॅक्टर ३.८३ ची मागणी

आठव्या वेतन आयोगाच्या दिल्ली टीमने पुणे आणि उत्तराखंडमध्ये बैठक पूर्ण केली आहे. आता ८ व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांनी ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. ती मागणी मान्य केली तर फक्त अधिकारीच नाही तर सरकारी शिपाई, क्लार्क, शिक्षक, रेल्वे कर्मचाऱ्यांपासून आएएस अधिकाऱ्यांचे पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.

किमान मूळ वेतन हे सध्या १८ हजार रूपये आहे. ते वाढून ६९,००० हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर ३० वर्षात पाचवेळा प्रमोश होऊ शकते. महागाई भत्ता आणि एचआरए सोबतच इतर भत्यात देखील तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून पगार किती वाढमार याचा एक अंदाज लावण्यात येत आहे.

पगार किती वाढणार?

८ व्या वेतन आयोगानुसार स्तर १ मध्ये शिपाई आणि अटेंडंट येतात. तर स्तर २ मध्ये लोअर डिव्हिजन, स्तर ३ मध्ये कॉन्स्टेबल आणि कुशल कामगार येतात. स्तर ४ मध्ये ग्रेड डी स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर क्लार्कचा समावेश होतो. यांचा सध्याचा पगार हा २५,५०० रूपये आहे.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार जर फिटमेंट फॅक्ट ३.८३ टक्के ठेवला तर किती पगारवाढ होणार हे जाणून घेऊयात.

लेवल १ - 18,000 मूळ वेतन वाढून ते 69,000 रूपये होईल.

लेवल २ - 19,900 मूळ वेतन वाढून ते 76,000 रूपये होईल.

लेवल ३ - 21,700 मूळ वेतन वाढून ते 83,000 रुपये होईल.

लेवल ४ - 25,500 मूळ वेतन वाढून ते 97,000 रुपये होईल.

लेवल ५ - 29,200 मूळ वेतन वाढून ते 1.11 लाख रुपये होईल.

मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांची पगारवाढ

लेवल ६ - 35,400 मूळ वेतन वाढून ते 1.35 लाख रुपये होईल.

लेवल ७ - 44,900 मूळ वेतन वाढून ते 1.72 लाख रुपये होईल.

लेवल ८ - 47,600 मूळ वेतन वाढून ते 1.82 लाख रुपये होईल.

लेवल ९ - 53,100 मूळ वेतन वाढून ते 2.03 लाख रुपये होईल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची पगारवाढ

लेवल-१३ : 1.23 लाख रुपये मूळ वेतन वाढून ते 4.71 लाख रुपये होईल.

लेवल-१४ : 1.44 लाख रुपये मूळ वेतन वाढून ते 5.52 लाख रुपये होईल.

लेवल-१५ : 1.82 लाख रुपये मूळ वेतन वाढून ते 6.97 लाख रुपये होईल.

लेवल-१८ : 2.50 लाख रुपये मूळ वेतन वाढून ते 9.57 लाख रुपये होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT