700 Rupees Momos Viral Video Pudhari
राष्ट्रीय

Viral Video: '700 रुपयांचे मोमोज?' डोंगरात भेटली गोंडस चिमुरडी, निरागसपणावर नेटकरी फिदा, इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

700 Rupees Momos Viral Video: '700 रुपयांचे मोमोज' असे निरागस उत्तर देणाऱ्या अद्विका या चिमुरडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

700 Rupees Momos Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका गोंडस चिमुरडीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. डोंगर रांगांमध्ये शाल पांघरून बसलेल्या या चिमुरडीच्या निरागस बोलण्याने आणि हसऱ्या चेहऱ्याने लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे, "मोमोज कितीला?" या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

'मोमोज कितीला?'... उत्तर ऐकून सगळेच थक्क

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चिमुरडीला विचारतो, "तू इथे काय करतेस?" त्यावर ती गोड हसत सांगते की, ती मोमोज विकते. पुढे मोमोजच्या एका प्लेटची किंमत विचारल्यावर ती अगदी निरागसपणे "700 रुपये" असे उत्तर देते.

हे उत्तर ऐकताच समोरचा व्यक्ती गंमतीने म्हणतो, "अरे, डोंगरात इतके महाग मोमोज?" त्यावर चिमुरडी पुन्हा हसत म्हणते, "आमच्याकडे मोमोज महागच मिळतात."

निरागस बोलण्यावर नेटकरी फिदा

या चिमुरडीचा बोलण्याचा अंदाज आणि चेहऱ्यावरील निरागस हसू पाहून सोशल मीडिया युजर्स अक्षरशः भारावून गेले आहेत. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देत, "या गोंडसपणासाठी 700 रुपये काय, आणखी 600 रुपये जास्त द्यायलाही तयार आहोत," अशा कमेंट्स केल्या आहेत.

ही चिमुरडी खरंच मोमोज विकते का?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की ही चिमुरडी खरोखरच मोमोज विकते. मात्र, प्रत्यक्षात तसं नाही. या चिमुरडीचं नाव अद्विका असून ती एक किड्स कंटेंट क्रिएटर आहे.

व्हिडिओमध्ये ऐकू येणारे प्रश्न तिच्या आई-वडिलांनी विचारले असून, हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. अद्विकाचं सोशल मीडिया अकाउंटही तिचे पालकच सांभाळतात.

कोट्यवधी व्ह्यूज, लाखो लाईक्स

या गोंडस व्हिडिओला आतापर्यंत 2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 9.5 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि 6,500 हून अधिक कमेंट्स आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "मोमोज बेचती हूं" असे लिहिण्यात आले असून, इतकं प्रेम दिल्याबद्दल अद्विकाच्या कुटुंबाने सर्वांचे आभारही मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT