Sanchar Sathi App Stolen Lost Mobiles Recovered:
ऑक्टोबर महिन्यात जवळपास ५० हजार हरवलेले आणि चोरी झालेले स्मार्ट फोन परत मिळाले आहेत. रिकव्हर झालेल्या मोबाईलची संख्या जून महिन्याच्या तुलनेत जवळपास ४७ टक्के जास्त आहे. हे सर्व मोबाईल शोधून काढण्यात संचार साथी पोर्टलने महत्वाची भूमिका बजावली आहे.
भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या अधीन राहून काम करणाऱ्या दूरसंचार विभाग (DoT) ने एक महत्वाची माहिती दिली आहे. DoT ने सांगितलं की या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चोरी झालेले किंवा हरवलेले जवळपास ५० हजार मोबाईल हँडसेट रिकव्हर करण्यात आले आहेत.
मोबाईल रिकव्हरीची संख्या प्रत्येक महिन्यात वाढत आहे. जूनच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ४७ टक्के जास्त मोबाईल हँडसेट शोधून काढण्यात यश आलं आहे. आतापर्यंत एकूण ७ लाखापेक्षा जास्त मोबाईल रिकव्हर करण्यात आले आहेत.
दूरसंचार विभागानं २०२३ मध्ये संचार साथी प्लॅटफॉर्म लाँच केला होता. या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं आतापर्यंत ७ लाखापेक्षा जास्त मोबाईल फोन शोधून काढण्यात आले आहेत. ही माहिती आकाशवाणी पोर्टलमधून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्वात जास्त हँडसेट हे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून रिकव्हर करण्यात आले आहेत. संचार साथीबाबत लोकांना जसजशी माहिती मिळत आहे. तसतसे मोबाईल रिकव्हरीची ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दूरसंचार विभागानं लोकांना आपल्या स्मार्ट फोनमध्ये संचार सारथी ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितलं आहे. हे ॲप फक्त रिपोर्ट, ब्लॉक किंवा चोरी झालेल्या फोनला शोधण्याचं काम करत नाही तर फेक मोबाईल हँडसेट ओळखण्यात देखील मदत करते.
संचार साथी ॲपमध्ये अनेक नवे फिचर मिळतात. या ॲपद्वारे युजर्स त्यांचे नाव किती सीम कार्डवर ॲक्टिव्ह आहे हे सहजरित्या जाणून घेऊ शकतात. संचार साथी ॲप आणि पोर्टलवर Know Mobile Connections in Your Name नावाचा एक ऑप्शन असतो. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या आयडीवर किती सीमकार्ड ॲक्टिव्ह आहे हे जाणून घेऊ शकता.