50 year old widow raped twice in 24 hours :
गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील उना शहरात एक धक्कादायद घटना घडली आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या शहरात एका ५० वर्षाच्या विधवेवर २४ तासात दोनवेळा सामुहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. याबाबतची माहिती देताना नवबंदर पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणातील तीनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
विधवा महिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीचं काम करत होती. तिच्यावर हा लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती मंगळवारी उना येथील सरकारी रूग्णालयात भरती झाली होती. तिच्या पोटात वेदना होऊ लागल्यावर तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं होतं. तिथं तिनं आपल्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचं सांगितलं. रूग्णालयानं मेडिको लीगल केस दाखल करून पोलिसांना याची माहिती दिली.
त्यानंतर या पीडित महिलेनं देखील नवबंदर मरीन पोलीस ठाण्यात तीन पुरूषांविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या महिलेच्या पतीच १० वर्षापूर्वी निधन झालं आहे.
दरम्यान, या पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत गेल्या आठवड्यात ती मांडवी चेकपोस्ट पासून आपल्या गावाकडं जात होती. त्यावेळी दोन बाईकवरून तिघेजण तिच्याजवळ आले. त्यांनी या महिलेला गावात सोडतो असं सांगितलं. या व्यक्ती महिलेच्या परिचयाच्या असल्यानं पीडित महिला देखील त्यांच्यासोबत जायला तयार झाली.
मात्र काही अंतर गेल्यानंतर त्यांनी निर्जन स्थळी नेलं अन् तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी पीडित महिलेला एका आरोपीच्या घरी नेलं अन् तिथंही त्यांनी या महिलेवर बलात्कार केला. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी त्या महिलेला घरी जाऊ दिली. मात्र याची वाच्यता कुठं केली तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील दिली होती.