

nagin wife bizarre Complaint :
माझी पत्नी रात्री नागीण बनते... ती मला घाबरवते.... यामुळं मी रात्री झोपू शकत नाही अशी तक्रार एका युवकानं खुद्द जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोमरच केली. या अजब तक्रारीची सध्या सगळीकडं चर्चा सुरू आहे. हे प्रकरणं महमूदाबाद तहसीलच्या लोधासा गावातील आहे.
मेराज नावाचा एक व्यक्ती ४ ऑक्टोबरला जनपदमध्ये आयोजित समाधान दिवस या दंडाधिकारी अभिषेक आनंद यांच्या उपक्रमात पोहचतो. त्यावेळी तो आपली तक्रार कागदावर लिहून देतो.
उत्तर प्रदेशात राहणारा मेराज म्हणतो, 'त्याचं लग्न थानगंव पोलीस स्टेशन क्षेत्रातील राजपूर इथं राहणाऱ्या नसीमुन हिच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सगळं व्यवस्थित सुरू होतं. मात्र त्यानंतर पत्नीनं अजब प्रकार करण्यास सुरूवात केली. तिच्या या वागण्यामुळं मी दहशतीखाली राहू लागलो.
मेराजने दंडाधिकाऱ्यांना सांगितलं की, त्याची पत्मी नसीमुन ही मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. ती रात्री अचानक उठते आणि नागीण बनते. ती माझ्यावर फुत्कारत राहते. रोज पत्नी मला घाबरवते. यामुळं मला रात्री झोपही लागत नाही. मेराजनं दंडाधिकाऱ्यांकडे माझ्या पत्नीपासून मला वाचवा अशी विनवणी केली आहे.
मेराजची ही तक्रार ऐकून उपस्थित सर्व जण आश्चर्य चकित झाले. या प्रकरणाची आता आसपासच्या गावात देखील चर्चा सुरू झाली आहे. मेराजच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. याची माहिती तिच्या आई वडिलांना देखील आहे. मात्र तरी देखील त्यांनी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं अन् माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं.
मेराजनं आपल्या पत्नीचा तांत्रिकाकडून देखील उपचार करून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच महमुदाबादच्या पोलीस ठाण्यात पंचायत देखील बसवण्यात आली होती. मात्र या समस्येचं समाधान काही झालं नाही. यानंतर दंडाधिकाऱ्यांनी ही तक्रार पोलीस ठाण्याकडं वर्ग केली असून त्यांना याचं समाधान शोधण्याचे आदेश दिले आहेत.