Mahindra Bolero
मुंबई: भारतातील वाहन बाजारात आपली मजबूत पकड कायम ठेवत, महिंद्राने लोकप्रिय बोलेरो आणि बोलेरो निओ मॉडेल्सच्या २०२५ अपडेट व्हर्जन लाँच केल्या आहेत. या गाड्या बाह्य आणि अंतर्गत बदलांसह बाजारात दाखल झाल्या आहेत, मात्र त्यांचे इंजिन पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे.
नवीन महिंद्रा बोलेरोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७.९९ लाख रूपये असून, बोलेरो निओची किंमत ८.४९ लाख पासून सुरू होते. या लाँचवेळी महिंद्राने सांगितले की, देशभरातील ग्राहकांच्या विश्वासाने बोलेरो मॉडेलच्या एकूण १६.८ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. हा आकडाच या मॉडेल्सची लोकप्रियता दर्शवतो.
नवीन Bolero मध्ये पूर्वीप्रमाणेच १.५-लीटर mHawk75 डिझेल इंजिन कायम ठेवले आहे, जे ७५ बीएचपी (bhp) पॉवर आणि २१० एनएम (Nm) टॉर्क निर्माण करते.
बाह्य डिझाइनमध्ये बदल काय?
बोलेरोचा मूळ आकार (silhouette) तसाच ठेवला आहे, पण आता तिला पाच स्लॅट्स असलेली नवीन ग्रील, नव्याने डिझाइन केलेले अलॉय व्हील्स, फॉग लॅम्प्स आणि सर्वात खास म्हणजे 'स्टेल्थ ब्लॅक' हा नवीन रंग मिळाला आहे, जो Bolero ला आणखी दमदार लुक देतो.
इंटीरियर कसे आहे?
आतल्या भागात आता लेदरेट अपहोल्स्ट्री आणि सीटवर मेश डिझाइन देण्यात आले आहे. यात १७.८ सेमी (७ इंच) इन्फोटेनमेंट युनिट आणि स्टिअरिंगवर ऑडिओ कंट्रोल्स मिळतात.
नवीन व्हेरियंट: बोलेरोला आता B8 नावाचा एक नवीन टॉप-एंड व्हेरियंट मिळाला आहे, ज्याची किंमत ९.६९ लाख (एक्स-शोरूम) आहे.
B4 ७.९९ लाख
B8 ९.६९ लाख
इंजिन: यातही १.५-लीटर mHawk डिझेल इंजिन कायम आहे, जे सुमारे १०० बीएचपी आणि २६० एनएम टॉर्कसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
बाह्य रचना: Neo चा लुक पूर्वीप्रमाणेच आहे, मात्र यामध्ये काही अपडेट्स आहेत.
उभ्या स्लॅट्ससह नवीन ग्रिल
R16 अलॉय व्हील्स
आणि आकर्षक "Jeans Blue" नावाचा नवीन कलर पर्याय.
अंतर्गत रचना: Neo मध्येही लेदरट अपहोल्स्ट्री आणि मेश डिझाइन देण्यात आले आहे.
टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये "Lunar Grey" कलर थीम,
तर लोअर व्हेरिएंटमध्ये "Mocha Brown" थीम दिली आहे.
तसेच, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि 22.9 सें.मी. इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे.
नवीन व्हेरियंट: बोलेरो निओमध्ये N11 हा नवीन टॉप-एंड व्हेरियंट आला आहे, ज्याची किंमत ९.९९ लाख (एक्स-शोरूम) आहे.
N4 ८.४९ लाख
N8 ₹9.29 लाख
N10 ₹9.79 लाख
N11 ₹ ९.९९ लाख