सिन्नर : नारळाच्या झाडावर चढाई करत असलेले नदी मादी बिबटे. (छाया: संदीप भोर) 
Latest

नाशिक : अंगावर काटा आणणारा नारळाच्या झाडावरील बिबट्याच्या चढाईचा थरार बघा…(Video)

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी धनगरवाडी (पिंपळगाव) रस्त्यालगत सांगवी शिवारात रामनाथ कोंडाजी घुमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर दोन बिबट्यांनी चढाई केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रविवारी, दि. 18 सकाळी सातच्या सुमारास बिबट्याचा थराराचा प्रकार समोर आला. बिबट्यांच्या जोडीची हातघाई सुरू असताना डरकाळ्यांचा आवाज ऐकल्याने नारळाच्या झाडापासून काही अंतरावर असलेल्या घुमरे यांच्या घरातील मंडळी बाहेर धावली. त्यावेळी सरळसोट नारळाच्या झावळ्यांमध्ये दडलेला एक बिबट्या खाली उतरत असल्याचा थरकाप उडवणारा प्रकार बघायला मिळाला. हा बिबट्या झाडालगच्या मक्याच्या शेतात उतरणार तोच खालून दुसऱ्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. अन विद्युत वेगाने दोन्ही बिबटे नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर पोहोचले. दरम्यान काळजाचे ठोके वाढवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि घुमरे वस्ती कडे लोकांची पावले वळली. दोन दिवसांपूर्वी याच भागात बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सांगवी येथील याच घुमरे वस्तीवर शनिवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात बिबट्याचा वावर आढळून आला होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून याच भागात बिबट्यांचे वास्तव्य आहे. दोन दिवसांपूर्वी वस्तीवरील एका गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. मात्र दोरखंड तोडून या गाईने जीव वाचवला होता.  दरम्यान बिबट्यांची जोडी बाजूच्या मक्याच्या शेतामध्ये लपली आहे. वनविभागाचे कर्मचारी व सल्ला कांगणे रंगनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. दिलीप कोंडाजी घुमरे, सुनील सखाहारी घुमरे यांच्या घराशेजारी व शांताराम विठोबा घुमरे यांच्या नारळाच्या झाडावर चढताना दोन बिबट्या आढळून आले. वनविभागाला कळवून आता सुनील सखाहरी घुमरे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे. यावेळी वनविभागाच्या वत्सला कांगणे, मधूकर शिंदे, यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT