सातारा मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या राष्ट्रीय टेबल टेनिसपटूचा मृत्यू | पुढारी

सातारा मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या राष्ट्रीय टेबल टेनिसपटूचा मृत्यू

सातारा, पुढारी वृत्तसेवा : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या राष्ट्रीय टेनिसपटूचा मृत्यू झाला आहे. राज क्रांतीलाल पटेल (वय-32, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर) असे युवकाचे नाव आहे. तो राष्ट्रीय पतळीवरील टेबल टेनिस खेळाडू म्हणून परिचित होता.

कोरोनानंतर सातारा हील हाफ मॅरेथॉन उत्साहात पार पडली. मॅरेथॉनला सुरुवात दिमाखात झाली. स्पर्धेत राज पटेल पुन्हा माघारी येत असताना अचानक धावमार्गावर पडला. ही घटना समोर येताच त्याला तत्कळ मॅरेथॉन संयोजकांनी यशवंत हॉस्पिटलला उपचारासाठी हलविले. मात्र हॉस्पिटमध्ये पोहचण्यापूर्वीच राज पटेलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर राज यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवून शवविच्छेदन करण्यात आले व तातडीने त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. तरुण खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संयोजकांनी व सातारकरांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Back to top button