Latest

Nashik Traffic : शहरातील वाहतूक कोंडीवर शिंदे गट करणार ऑनलाइन सर्व्हे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी फेसबुकवर आॅनलाइन सर्वेक्षण सुरू केले असून, शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी काय करता येईल, याविषयीचे जनमत आजमाविण्यात येत आहे. (Nashik Traffic)

संबधित बातम्या :

नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. यावर तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास आगामी काळात गंभीर परिस्थिती उद‌्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतूक कोंडीची समस्या देशभरात नाशिकची नाचक्की करणारी ठरण्याची शक्यता आहे. सरकारी यंत्रणा या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, व्यापक जनसहभागाशिवाय हा प्रश्न सुटणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने फेसबुकद्वारे जनमत आजमाविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील, यासंदर्भातील कमेंट‌्स‌् जाणून घेण्यात येत आहेत. प्राप्त जनमताचा अहवाल महापालिका आणि पोलिस प्रशासनाला सादर केला जाणार असून, त्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचे जिल्हाप्रमुख बोरस्ते सांगितले. (Nashik Traffic)

पर्यायांद्वारे चाचपणी

या आॅनलाइन सर्वेक्षणांतर्गत काही पर्यायही सुचविण्यात आले असून, सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्यास पर्याय निवडण्याची संधी आहे. यात ट्रॅफिक पोलिसांची संख्या व कार्यक्षमता वाढविणे, रस्ते रुंद करणे, पार्किंगसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे, वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळणे, पब्लिक ट्रान्स्पोर्टेशन अधिक सक्षम करणे, दिल्लीच्या धर्तीवर सम-विषम पार्किंग व्यवस्था या पर्यायांचा समावेश आहे. त्याचबरोबर कमेंटद्वारेही आपले मत मांडता येणार आहे. दोन दिवसांसाठी हे आॅनलाइन सर्वेक्षण असणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न व्यापक जनसहभागाशिवाय सुटणे शक्य नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांबरोबरच नाशिककर नागरिकांनीदेखील या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढे आले पाहिजे. यासाठी शिवसेनेने हे आॅनलाइन सर्वेक्षण सुरू केले असून, याद्वारे जनमत आजमाविण्यात येत आहे.

– अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना(शिंदे गट)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT