१९ खलिस्तान्यांच्या मालमत्ता जप्त होणार; पन्नूवरील कारवाईनंतर भारताचा धडाका

१९ खलिस्तान्यांच्या मालमत्ता जप्त होणार; पन्नूवरील कारवाईनंतर भारताचा धडाका
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गुरुरपतवंत सिंग पन्नू यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्यानंतर भारताने देशाबाहेर राहणार्‍या खलिस्तान्यांभोवतीचा फास आवळायला प्रारंभ केला आहे. विदेशात राहणार्‍या 19 खलिस्तानी दहशतवाद्यांच्या भारतातील मालमत्ता लवकरच जप्त करण्यात येणार असून त्यासाठीच्या हालचलींना वेग आला आहे.

'एनआयए'च्या नेतृत्वाखाली सुरक्षा यंत्रणा व मुलकी यंत्रणा ही मोहीम राबवणार असून त्यात ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांत राहून खलिस्तानी चळवळीचे काम करणार्‍या दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील 19 जणांच्या मालमत्तांवर लवकरच टाच आणली जाणार आहे. या सर्वांच्या भारतातील मालमत्तांची ओळख पटवून यादी तयार करण्यात आली असून लवकरच त्या सर्व जप्त करण्यात येणार आहेत.

ही आहे यादी

'यूएपीए'अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या यादीत ब्रिटनमधील परमजीत सिंग पम्मा, पाकिस्तानातील वाधवा सिंग बब्बर ऊर्फ चाचा, ब्रिटनमधील कुलवंतसिंग मुथरा, अमेरिकेतील जय धालीवाल, ब्रिटनमधील सुखपाल सिंग, अमेरिकेतील हरप्रीतसिंग ऊर्फ राणा सिंग, ब्रिटनमधील सरबजीतसिंग बेन्नूर, ब्रिटनमधील कुलवंतसिंग कांता, कॅलिफोर्नियातील हरजाप सिंग जप्पी, लाहोरमधील रणजितसिंग नीता, ब्रिटनमधील गुरमीत सिंग ऊर्फ बग्गा ऊर्फ बाबा, ब्रिटनमधील गुरप्रीतसिंग ऊर्फ बागी, दुबईतील जसमीत सिंग हाकीमजादा, ऑस्ट्रेलियातील गुरजंतसिंग धिल्लन, युरोप आणि कॅनडातील लखबीर सिंग रोडे, अमेरिकेतील अमरदीप सिंग पुरेवाल, कॅनडातील जतींदर सिंग ग्रेवाल, ब्रिटनमधील दुपिंदरजीत सिंग आणि अमेरिकेतील हिंमत सिंया यांचा समावेश आहे.

कॅनडाने माहिती दिली होती : अमेरिका

ज्या निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांचे संबंध बिघडले आहेत, त्या निज्जरच्या हत्येत भारताचा हात होता, अशी माहिती कॅनडाने अमेरिकेला दिल्याचे कॅनडातील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड कोहेन यांनी म्हटले आहे. कॅनडाने दिलेली माहिती ही प्रत्यक्ष अथवा टेहळणीवर आधारित आहे याचा खुलासा करणे अमेरिकेच्या राजदूतांनी टाळले आहे.

धमकीचे पोस्टर्स हटवण्याचे आदेश

निज्जरच्या हत्येला जबाबदार धरत भारतीय दूतावासातील कर्मचार्‍याच्या हत्येची धमकी देणारी पोस्टर्स खलिस्तान्यांनी कॅनडाच्या सरे भागातील गुरुद्वारांसमोर लावल्याने वातावरण आणखीच बिघडले. याची दखल घेत कॅनडाच्या सरकारने ही सर्व पोस्टर्स तत्काळ काढून टाकण्याचे आदेश गुरुद्वारांना दिल्याचे वृत्त आहे. गेल्या जून महिन्यात कॅनडातील याच सरे भागात निज्जरची त्याच्या वाहनात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news