सप्तशृंगगड प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांपासून गुटखा व्यावसायिकांवर चाप बसविण्यासाठी पोलीसांची धडक कारवाई सुरू आहे. नाशिक जिल्हाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी धडक मोहिम राबवली असून आज सप्तशृंगगडावर तीन दुकानांवर धाड टाकून कळवण पोलिसांनी हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला.
रात्री 10 वाजेच्या दरम्यान तीन टपऱ्यांवर कळवण पोलीस स्टेशन अंर्तगत नांदुरी बीट पोलीस हवालदार गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारो रूपयांचा गुटखा पकडला. शेजारील गुजरात राज्यातून वणी, आभोणा, कळवण व सप्तशृंगगडावर गुटखा येत असून गुटखा तस्करी नियंत्रणात येत का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी गुटखा तस्करीचे मुळ शोधून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने गुटखा येत असून त्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. सप्तशृंगगडावर देखील सर्हास गुटखा विक्री होत असून आज नांदुरी येथील पोलीस हवालदार योगेश गवळी व त्याच्या सहका-यांनी धाड टाकून हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला.
हेही वाचा :