Latest

नाशिक : जातवैधता प्रमाणपत्रासाठी 30 पर्यंत विशेष मोहीम

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व कालावधी राबविण्यात येत आहे. या कालावधीत राज्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपआयुक्त राकेश पाटील यांनी दिली.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी शिक्षण फीची प्रतिपूर्ती करण्याकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन अर्ज भरलेले नाहीत त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (website) सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावेत. त्यानंतर ऑनलाइन अपलोड केलेला अर्ज व मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती व मूळ शपथपत्र जिल्हा जातपडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन वेळेत जमा करण्याचे आवाहन उपआयुक्त पाटील यांनी केले. अर्जदारांनी अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल व मोबाइल क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समितीचा निर्णय किंवा जातवैधता प्रमाणपत्र हे अर्जदाराने नोंदणी केलेल्या ई-मेलवर पाठवत असल्याने अर्जदारांनी आपला युझर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावे, असे पाटील यांनी सांगितले.

विशेष त्रुटी पूर्तता मोहीम
अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी अर्जदारांकडे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांना जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्याप ज्या अर्जदारांनी केलेली नसून त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांसाठी विशेष त्रुटी पूर्तता मोहीम असणार आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT