संजय राऊत,www.pudhari.news 
Latest

Nashik : त्र्यंबकमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही, मंदिरात कुणीही बळजबरी शिरलं नाही : संजय राऊत

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

त्र्यंबकेश्वर मध्ये काहीही चुकीचं घडलं नाही. उरुसंच धूप आपल्या देवांना दाखवण्याची जुनी प्रथा आहे. मंदिराच्या गेटवर आपल्या देवांना धूप दाखवून ते पुढे जातात. मी पर्वाच्या घटनेची माहिती घेतली, मंदिरात बळजबरीनं शिरण्याचा कुणीही प्रयत्न केला नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथे घडलेल्या कथित प्रकरणावर दिली आहे.

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण दूषित करायचे असा कट मला दिसतो आहे. आमच्या इतकं कडवट हिंदुत्ववादी या देशात कोणी नाही, आम्ही ढोंगी नाही. त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये कधीही अशा घटना घडल्याचे स्मरणात नाही. मी पर्वाच्या घटनेची माहिती घेतली, त्यानुसार कुणीही मंदिरात घुसल्याची माहिती माझ्याकडे नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचे पत्र त्यांना द्यायला लावल्याचे संजय राऊत म्हणाले.

त्र्यंबकेश्वरच्या निमित्ताने महाराष्ट्राचे वातावरण उद्धवस्त करायचे, नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंभा मारायच्या असे सगळे सुरु असल्याची टीका संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथील प्रकरणावरुन केली आहे.

रामनवमी संदर्भात एसआयटी नेमली का?

त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर एका धर्माच्या काही तरुणांनी धूप, आरती व फुले वाहन्याचा प्रयत्न केल्याच्या या कथित घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बोलताना, गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात रामनवमीला कधीही दंगल झाली नव्हती, पहिल्यांदाच असे घडले. रामनवमी संदर्भात आपण एसआयटी नेमली का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. या सरकारच्या पायाखालची जमीन हादरली आहे, त्याचाच हा परिणाम असल्याचे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT