Cannes : रेड कार्पेटवर उतरली स्वप्नपरी, ईशा गुप्ताला पाहून सगळेच थक्क | पुढारी

Cannes : रेड कार्पेटवर उतरली स्वप्नपरी, ईशा गुप्ताला पाहून सगळेच थक्क

पुढारी ऑनलाईन डेस्क : 76 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. (Cannes) १६ ते २७ मे पर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे. दरम्यान, या वर्षी बॉलिवूडचे अनेक सेलेब्स कान्समध्ये आपला डेब्यू करणार आहे. फॅन्स त्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, बॉलिवूड दिवा ईशा गुप्ताचा कान्समधील रेड कार्पेटवरून लूक समोर आला आहे. कान्समध्ये पहिल्या दिवशी ईशा पिंक कलरची थाय हाय स्लिट आऊटफिटमध्ये दिसली. (Cannes)

रेड कार्पेटवर तिला पाहून सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. पिंक आऊटफिटसोबत तिने ग्लोईंग मेकअप केला होता. मॅचिंग ईअरिंग्ज आणि स्टायलिश हेअरस्टाईल सोबत ईशाने आपल्या अदांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली.

ईशा केंद्रीय राज्य मंत्री डॉ. एल मुरुगन यांच्या नेतृत्वाखालील टीमचा एक बाग होऊन कान्समध्ये पोहोचली. इन्स्टाग्रामनर तिने व्हिडिओ शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.

ईशा म्हणते, मी भारत सरकारच्या प्रतिनिधीमंडळाचा भाग बनून कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये येऊन खूप खुश आहे. रेड कार्पेटवर चालणे एक स्वप्न सत्यात उतरल्याप्रमाणे आहे.

ईशाप्रमाणे यावर्षी अनुष्का शर्मा, सारा अली खान, मृणाल ठाकूरदेखील कान्समध्ये डेब्यू करणार आहे.

Back to top button