कळवण : शिवतीर्थावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत उंच भगवा मानाने फडकलेला शिवध्वज.
नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत मी साकारली, या मालिकेने खराखुरा इतिहास घराघरात पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराज ऐकणे, वाचणे समजून घेणे सोपे आहे. मात्र, तशी वाटचाल करणे अवघड आहे. परंतु ती करायला आपण शिकले पाहिजे. लहान मुलांसाठी शिव चरित्र वाचन केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे मत स्वराज्यरक्षक मालिकेतील शिवरायांची भूमिका साकारणारे कलाकार शंतनू मोघे यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या अनोख्या संकल्पनेतून भगव्या शिवध्वजाची प्रतिष्ठापना सोहळा शिवतीर्थावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठया थाटात अन ढोल ताशांच्या गजरात भगव्यामय वातावरणात मोठया उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोघे बोलत होते. यावेळी शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करताना कधीच जाती – पातीला थारा दिला नाही. त्यामुळे त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन करीत आजच्या तरुणांमध्ये कोणतेही आदर्श नसल्याने त्यांना संस्काराची गरज असल्याचे मत प्रा. गोसावी यांनी यावेळी व्यक्त केले. भव्य प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहण सोहळ्याला श्री श्री 1008 श्री गणेशानंदजी सरस्वती महाराज, स्वराज्यरक्षक मालिकेतील शिवरायांची भूमिका साकारणारे कलाकार शंतनू मोघे, कीर्तनकेसरी संजय धोंडगे, शिवचरित्र व्याख्याते प्रा यशवंत गोसावी, आमदार नितीन पवार, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष कौतिक पगार, पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, तहसीलदार बी ए कापसे, उदयोगपती बेबीलाल संचेती, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे, शेतकरी नेते देविदास पवार, जेष्ठ नेते बाबुलाल पगार, पोलीस निरीक्षक समाधान नागरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार व समिती सदस्यांनी केला.
प्रारंभी कळवणकरांचे ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदीर व श्री हनुमान मंदिरात विधिवत शिवध्वजाचे पूजन केल्यानंतर गांधी चौकातून शिवध्वज रथाची पूजा व आरती माजी नगरसेवक, ज्येष्ठ पत्रकार मनोज देवरे यांनी सपत्नीक केल्यानंतर मिरवणूकीस प्रारंभ झाला. गांधीचौक, भाजीमंडई, गणेशनगर, बसस्थानक मार्गाने मेनरोडने शिवतीर्थावर मिरवणूकीचा समारोप झाला. ठिकठिकाणी शिवध्वज रथाचे नागरिकांनी जोरदार स्वागत करण्यात आले तर महिलांनी विधिवत पूजा केली.
ध्वज स्तंभस्थळाजवळ एकूण 11 जोडप्यांनी भगव्या शिवध्वजाचे धार्मिक विधिवत पूजन पुरोहित नंदू चंद्रात्रे व सहकार्यांनी धार्मिक मंत्रोचारात केल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शिवध्वजाचे मोठया उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत गगनभेदी घोषणा दिल्या. यावेळी वातावरण भगवेमय झाले होते. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांच्या जोरदार झालेल्या अतिशबाजीमुळे उपस्थितामध्ये उत्साह संचारला होता. प्रास्तविक दिपक हिरे, राकेश हिरे यांनी सूत्रसंचलन व आभार मानले. यावेळी रोहित पगार, राजेश पगार, अविनाश पगार, जयेश पगार, अतुल पगार,नितीन पगार, गौरव पगार, राहुल पगार,परेश कोठावदे, सुधाकर खैरनार, सुनील गांगुर्डे, मनिष पगार ,संदीप पगार, सोनू निकम, योगेश पगार, प्रशांत कासार, दिनेश पवार आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
'हा भगवा रंगाचा शिवध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कळवण तालुक्याला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. हा ध्वज उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा ठरणार आहे. सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती यांचेही प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील,'. – भूषण पगार, अध्यक्ष शिवस्मारक समिती कळवण.
नाशिक : भगवा, शिवध्वज ध्वजारोहणप्रसंगी पूजन करतांना श्री गणेशानंदजी सरस्वती महाराज, शंतनू मोघे, संजय धोंडगे, प्रा. यशवंत गोसावी, आमदार नितीन पवार, सचिन पाटील, नगराध्यक्ष कौतिक पगार,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार आदी.नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पूजनप्रसंगी श्री गणेशानंदजी सरस्वती महाराज, शंतनू मोघे, संजय धोंडगे, प्रा. यशवंत गोसावी, आमदार नितीन पवार, सचिन पाटील, नगराध्यक्ष कौतिक पगार,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार आदी. (सर्व छायाचित्रे: बापू देवरे)हेही वाचा:
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.