सिन्नर : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील, कोतवाल रिक्तपदांची भरती प्रक्रिया चालु करण्यात आलेली असून १० डिंसेबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी https://nashik.ppbharti.in या संकेस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहेत. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी माहिती दिली.
मागील महिन्यात होणारी ही परीक्षा काही कारणास्तव तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक, कळवण, उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, दिंडोरी, येवला, बागलाण, मालेगांव आदींच्या माहितीस्तव प्रत रवाना करण्यात आली आहे.
हेही वाचा :