नाशिक : पुढारी वृत्तसेवा., एमडी ड्रग्ज प्रकरणात कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे अधिकची माहिती असल्यास त्यांनी तातडीने ती जाहिर करावी. शासनावर विश्वास नसल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. पण त्यासाठी राज्य अधिवेशानाची प्रतिक्षा करू नये, असे आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यामुळे येत्या काळात एमडी ड्रग्जवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फैरी झडताना दिसणार आहेत. (Nashik News)
संबधित बातम्या :
कॉग्रेसचे पटोले यांनी सोमवारी (दि.९) नाशिकमध्ये एमडी ड्रग्जसंदर्भात बोलताना सरकारमधील आमदारांचा त्यात समावेश असल्याचा आरोप केला. या आरोपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई व चाऱ्याच्या आढावा बैठकीप्रसंगी आलेल्या भुसे यांना विचारले असता पटाेलेंनी त्यांच्याकडील माहिती तातडीने द्यावी. त्यासाठी अधिवेशनाची वाट पाहू नये, असे ते म्हणाले. तसेच नाशिक व मुंबई पोलिसांनी ड्रग्जसंदर्भात चांगली कामगिरी केली. या प्रकरणात सरकारमधील आमदारांचा समावेश असल्यास पटोलेंनी ते उघड करावे, असा सल्लाही भुसे यांनी दिला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी पक्षाच्या मुखपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात १७८ कोटींचा अपहार झाल्याचा आरोप भुसे व मालेगावकर यांच्यावर केला हाेता. याबाबत भुसे यांना विचारले असता अधिवेशनावेळी सभागृहात यावर स्पष्टीकरण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालेगावच्या जनतेचा अपमान केल्याने राऊत यांनी मालेगावकारांची माफी मागावी, अशी नोटीस दिली होती. पण राऊतांनी माफी न मागितल्याने तसेच खोटे आरोप मागे न घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती भुसे यांनी दिली. (Nashik News)
राज ठाकरेंना माहिती देऊ
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टोल आकरणीला विरोध दर्शविला आहे. याबाबत भुसे यांचे लक्ष वेधले असता त्यावर भाष्य करताना भुसे यांनी राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी टोलसंबंधी त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल. वस्तुस्थितीही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा :