file photo  
Latest

Nashik Murder : चांदवडला वादातून व्यावसायिकाचा खून

गणेश सोनवणे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने हल्ला केल्याने राजेंद्र केदु शिंदे (४४) हा व्यावसायिक गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मुत्यू झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील दुगाव येथे मंगळवारी (दि.१६) दुपारी घडली.

कोकणखेडे येथील मूळ रहिवाशी असलेले व सध्या व्यवसायानिमित्ताने दुगाव येथे राहणारे राजेंद्र शिंदे यांचे गावातीलच चंचल क्षीरसागर यांच्याशी वाद होता. त्यांच्यात दुपारी अडीचच्या सुमारास दुगावमध्ये वाद झाले. या वादात शिंदेच्या छातीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना चांदवडच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले असता त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. याबाबत चांदवड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT