दिंडोरी : शहरातील शिवाजीनगर येथील संतोष साताळकर यांच्या घरात चोरट्यांनी अस्ताव्यस्त केलेले सामान. (छाया - समाधान पाटील) 
Latest

नाशिक : दिंडोरीत भरदिवसा धाडसी चोरी

अंजली राऊत

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा 
दिंडोरी शहरातील शिवाजीनगर येथील संतोष शरद साताळकर यांच्या मालकीच्या लक्ष्मी निवास या घरात भरदिवसा धाडसी चोरी होवून तीन तोळे सोने व 1 लाख 38 हजार रक्कमेची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिंडोरी शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. आता भरदिवसाही चोर्‍या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे रहात असलेले संतोष शरद साताळकर यांच्या पत्नी उज्वला साताळकर सोमवारी (दि.12) रोजी दुपारी 1 च्या सुमारास घर बंद करुन एलआयसी ऑफिसमध्ये गेल्या. त्यानंतर साधारण 2 वाजता त्या घरी परतल्या असता घराच्या गेटमधून दोन अनोळखी व्यक्ती हातात चाकू घेऊन बाहेर पडतांना दिसले. त्यांनी उज्वला साताळकर यांना चाकू दाखवत बाजूला सरकण्यास सांगत  पळ काढला. साताळकर यांना घराचे कुलूप तोडलेले आढळले. त्यांनी पती संतोष साताळकर यांना घडलेली माहिती सांगितली. घरात जावून बघितले असता घरातील तीन तोळे सोने व 1 लाख 38 हजार रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कौटे व पोलिस करीत आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT