चांदवड येथील प्राचीन गुहा 
Latest

Nashik Chandwad : सह्याद्री पर्वतरांगेतील प्राचीन गुहेत हिंदू संस्कृतीचे प्रतीक

गणेश सोनवणे

चांदवड : सुनील थोरे

नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावच्या पूर्वेला आठव्या ते नवव्या शतकात कोरलेल्या गुहेत हिंदू धर्मातील देवी-देवतांसह जैन धर्मातील देवतांच्या कोरलेल्या मूर्ती आढळल्याने अभ्यासकांना एका वेगळ्या विषयाची माहिती उपलब्ध झाली आहे, (Nashik Chandwad)

एक गुहा कोरलेली असून, ती सुमारे आठव्या ते नवव्या शतकातील असावी. या गुहेमध्ये जैन धर्माचे आद्य चंद्रप्रभू भगवान यांच्यासह अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याचबरोबर हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या देवता गणपती, कालिकादेवी, शीतलामाता यांच्याही मूर्ती याच गुहेत आपल्याला बघायला मिळतात. यावरून सर्वधर्म समभावाचा संदेश नक्कीच मनाला बोध करून जातो. Nashik Chandwad

संबधित बातम्या :

सह्याद्रीच्या या पर्वत रांगेत अंदाजे 250 फूट चालून गेल्यानंतर ही गुहा लागते. गुहेत प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच दिसते ती भगवान चंद्रप्रभूंची शांत ध्यानस्थ मूर्ती. जैन धर्माचे मूळ नायक १००८ श्री चंद्रप्रभू भगवान, आदिनाथ भगवान, पार्श्वनाथ भगवान अशा अनेक मूर्ती या गुहेमध्ये कोरलेल्या आहेत. या लेणी जैन दिनदर्शिका प्रमाणे चतुर्थकाल म्हणजेच सुमारे २६०० ते २७०० वर्षांपूर्वी कोरल्याचा अंदाज जैन अभ्यासक व्यक्त करतात. गुहेच्या डाव्या बाजूला सुमारे ५० फूट अंतरावर १५ फूट उंचीवर पाण्याची कोरीव चौकोनी टाकी आहे. या टाकीची लांबी 10 फूट, तर रुंदी पाच फूट अशी रचना केली आहे. टाकीवर चढण्या-उतरण्यासाठी तिरप्या स्वरूपाच्या पायऱ्या आहेत. टाकीतील पाणी अतिशय थंड असते. गुहेमधील कालिका म्हणजेच जैन तत्त्वज्ञानात व धर्मग्रंथातील पद्मावती माता आहे असे म्हणतात. गुहेच्या पायथ्याशी पूर्वी आजच्या गोसावी कुटुंबीयांचे वंशज दयालपुरी नावाचे गृहस्थ राहात होते. त्यांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी देवी अहिल्याबाई होळकर यांचे सासरे तुकोजी होळकर यांच्याकडे जागेची मागणी मंजूर व्हावी, यासाठी सुमारे ४१ दिवसांचे एका पायावर तप केले व जागा मिळवली असे सांगितले जाते. या मागणीवरूनच आजही चांदवड येथील गोसावी कुटुंबीयांकडे वारसा हक्काप्रमाणे या मंदिराची देखभाल व व्यवस्था आहे. त्या संदर्भातील जुनी कागदपत्रेही त्यांनी आजदेखील जतन करून ठेवली आहे. वंश विस्तारामुळे हे गोसावी कुटुंबीय यांनी एक वर्षाची मंदिर व्यवस्थापनाची पाळी ठरवून घेतली आहे. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला ही पाळी बदलली जाते. (Nashik Chandwad)

कालिकादेवी अनेक हिंदू धर्मीयांची कुलस्वामिनी आहे. गुहेतील कालिकादेवीची मूर्ती ही चतुर्भुज असून आसनस्थ आहे. अतिशय प्राचीन असल्यामुळे या मूर्तीची बरीच झीज झालेली आहे. या मूर्तीचे वज्रलेपन करून पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्याचा मानस मंदिराचे सुशांतपुरी गोसावी, गोसावी कुटुंबीय आणि अनेक भाविकांनी केलेला आहे. त्यानुसार रविवारी (दि. १७) मूर्तीचे विधिवत कलाकर्षण हा धार्मिक विधी करण्यात आला. या कार्यक्रमाचे पौरोहित्य अमोल दीक्षित यांनी केले. देवीची पुनर्प्राणप्रतिष्ठा सोमवारी अश्विन नवरात्रातील दुसऱ्या माळेला होणार असून, हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी भाविकांनी मदत करावी असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT