नाशिक : निफाड तालुक्यातील खडक माळेगावचे सुपुत्र, भारतीय लष्कराचे जवान योगेश सुखदेव शिंदे यांचे अपघाती निधन झाले. गावी सुट्टीवर आले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या अपघाती मृत्यूने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मंत्री छगन भुजबळांकडून श्रद्धांजली
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले आपल्या नाशिक जिल्ह्यातील खडक माळेगावचे (ता. निफाड) सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांच्या अपघाती निधनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली! गावी सुटीवर आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शिंदे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्दांजली अर्पण केली आहे.
हेही वाचा :