NASA : औरंगाबादच्या दिक्षा शिंदेची नासाच्या पॅनेलिस्ट म्हणून निवड 
Latest

NASA : औरंगाबादच्या दिक्षा शिंदेची नासामध्ये पॅनेलिस्ट म्हणून निवड

backup backup

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ग्रह, ताऱ्यांकडे एक मनोरंजन, गंमत म्हणून पाहण्याच्या वयात औरंगाबादच्या दिक्षाने त्यांच्याकडे गंमत म्हणून न पाहता चिकित्सक वृत्तीने पाहिले. त्याचा फायदा तिला असा झाला की, नासाच्या (NASA) 'एमएसआय'या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅलनिस्ट म्हणून निवड झाली. तिची ही निवड तिसऱ्या प्रयत्नात झाली आहे.

ज्या वयात मुली भातुकलीच्या खेळात रमतात. त्या वयात शहरातील १४ वर्षीय इयत्ता दहावीच्या (आयसीएसई बोर्ड) वर्गात शिकणाऱ्या दिक्षा शिंदेने स्वत:ला ग्रह, ताऱ्यांच्या विश्वात रमवले. आठवीला असल्यापासून स्टीफन्स हॉकिन्स यांचे पुस्तके वाचायची सवय आहे. ती नासाचे संकेतस्थळ रोज पाहून त्यावरील माहिती वाचत असे. नासाची माहिती नवनवीन जाणून घेणे याची खूप आवड असल्याने ती संकेतस्थळावर प्रथम जून २०२० मध्ये आर्टिकल पाठवले. मात्र ते रिजेक्ट झाले.

त्यानंतर तिने पुन्हा आर्टिकल पाठवले दुसऱ्यांही ते रिजेक्ट झाले होते. परंतु तिने हार मानली नाही. तिच्या कुटुंबियांनी देखील तिला यात खूप साथ दिली आहे. अखेर सप्टेंबर २०२० मध्ये तिसऱ्यावेळी मात्र तिच्या आर्टिकलची निवड झाली.

दिक्षा म्हणते की, "ब्लॅक होल्स एण्ड गॉड' देवाच्या अस्तित्वासंबंधीचे आर्टिकल पाठवले होते. ज्यात मी देव नाही आहे असे विचार मांडलेत. दोनवेळा रिजेक्ट झालेल्या आर्टिकलची तिसऱ्या टप्प्यात निवड झाली तीन महिने त्यासाठी लागेल", असे दिक्षाने सांगितले.

नासाच्या (NASA) एमएसआयया फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅलनिस्ट म्हणून निवड झाली. दहावीत असून, पुढे मला एस्ट्रोफिजिक्स या विषयात पदवीचे शिक्षण घ्यायचे आहे. नुकतेच नासाने मला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केले आहे. परंतु ती कॉन्फरन्स ऑनलाइन अटेंड करणार आहे. दिक्षाचे वडील कृष्णा शिंदे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील केंद्रिय निवासी माध्यमिक आश्रम शाळेत मुख्याध्यापक आहेत. तर आई रंजना शिंदे या गृहिणी आहेत.

दिक्षाच्या आईवडिलांनी सांगितले की, "दिक्षा सुरुवातीला नेमकं काय करते आहे, हे माहीत नव्हतं. ती विविध ऑनलाईन प्रमाणपत्रं मिळवू लागली, तेव्हा असं वाटलं की, फ्रॉड असेल. परंतु आता खूप आनंद झाला आहे. तिच्या ऑनलाइन मिटींग होतात, त्याचे मानधन पन्नास हजार मिळत आहे."

"मी नासाच्या आर्टिकलसाठी खूप मेहनत घेतली. दोन वेळा अपयश आले, तरीही हार मानली नाही. पुढे एस्ट्रोफिजिक्समध्ये पदवी करायची आहे. मुलींनी करियरबाबत आपल्या मर्यादा न आखता स्वत:चे पॅशन, आवड याकडे लक्ष द्यावे. यश नक्की मिळते", असं मत दिक्षा शिंदे हिने मांडलं.

पहा व्हिडीओ : … अशी फोडली जाते खायी 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT