Latest

Nasa Artemis 1 Launch : मून मिशनसाठी आर्टेमिस 1 यशस्वीरित्या लाँच, 50 वर्षानंतर चंद्रावर पाठवले…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Nasa Artemis 1 Launch : मंगळ मोहिमेनंतर नासाने आता पुन्हा एकदा चांद्र मोहीमेवर (Moon Mission) लक्ष केंद्रित केले आहे. नासाने आज आर्टेमिस -1 यशस्वीरित्या लाँच केले आहे. नासाने तब्बल 50 वर्षानंतर चंद्रावर यान पाठवले आहे. मंगळ मोहिमेनंतर नासाची आर्टेमिस -1 ही मोहीम सर्वात महत्वाची मोहीम आहे.

Nasa Artemis 1 Launch : नासाने फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून आर्टेमिस 1 यशस्विरित्या लाँच केले. अमेरिकेने 50 वर्षांपूर्वी अपोलो मिशन अंतर्गत 1969 ते 1972 पर्यंत 17 मोहिमांमध्ये एकूण 12 अंतराळवीर पाठविले होते. त्यानंतर आतापर्यंत पुन्हा कोणत्याही अंतराळवीरांना नासाने चंद्रावर पाठवलेले नाही.

नुकत्याच पार पडलेल्या मंगळ मोहिमेनंतर अमेरिकेने 2025 पर्यंत पुन्हा एकदा चंद्रावर अंतराळवीरांना पाठविण्याची योजना आखली आहे. त्यादृष्टीने 'आर्टेमिस -1' मोहीम अतिशय महत्वाची आहे. आर्टेमिस-1 मोहिमेनंतरच शास्त्रज्ञ चंद्रावर पोहोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील.

Nasa Artemis 1 Launch : काय आहे मून मिशन

अमेरिका तब्बल 50 वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याची तयारी करत आहे. त्यासाठी ओरियन हे अंतराळयान तयार करण्यात आले आहे. तत्पूर्वी चाचणी करण्यासाठी आर्टेमिल 1 हे उड्डाण घेण्यात आले आहे. आर्टेमिसमधून सध्याच्या चंद्राभोवतीच्या परिस्थितीचा अंदाज घेता येणार आहे. हे वातावरण अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेणे हे आर्टेमिस 1 पाठविण्याचे लक्ष्य आहे. तसेच चंद्रावर पाठविलेले अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकतील का याची तपासणी देखिल यातून केली जाणार आहे.

आर्टेमिस 1 रॉकेट हेवी लिफ्ट आहे आणि आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली इंजिने आहेत. हे रॉकेट चंद्राच्या कक्षेत जाऊन काही छोटे सॅटेलाइट सोडेल आणि नंतर स्वतःच्या कक्षेत स्थापित होईल.

आर्टेमिस 1 नंतर आर्टेमिस 2 आणि 3 पाठविण्यात येईल. यात काही अंतराळवीरांचा समावेश असेल मात्र हे अंतराळवीर चंद्रावर उतरणार आहे. तर आर्टेमिस 3 मधील अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहेत.

Nasa Artemis 1 Launch : मोहिमेचा कालावधी आणि खर्च

ही मोहीम 42 दिवस, 3 तास आणि 20 मिनिटांची आहे, त्यानंतर ते पृथ्वीवर परत येईल. हे यान एकूण 20 लाख 92 हजार 147 किलोमीटर अंतर कापणार आहे. नासाच्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 7,434 अब्ज रुपये खर्च येईल. तर प्रत्येक फ्लाईटची किंमत 4.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 327 अब्ज रुपये इतकी असणार आहे. आतापर्यंत 2949 अब्ज रुपये यावर खर्च झाले आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT