Dr. Supriya Gavit 
Latest

नंदुरबार : भाजपच्या डॉ. सुप्रिया गावित; काँग्रेसच्या गीता पाडवी विजयी

backup backup

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित करण्यास सुरूवात झाली असून माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या भगिनी डॉ. सुप्रिया गावित या कोळदे गटातून १३६९ मतांनी विजयी झाल्या आहेत.

Gita Padavi

१२ हजार ५६३ मतांपैकी ६ हजार ७०७ मते त्यांना मिळाली. येथे शिवसेनेच्या आशा पवार ५ हजार ३३९ मते मिळून पराभूत झाल्या. अक्कलकुवा आणि खापर गटात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत.

यामध्ये खापर गटातून आदिवासी विकास मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री वकील के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी गटातून सुरय्या मकरानी या विजयी झाल्या आहेत. होळ तर्फे हवेली गणात भाजपच्या सिमा मराठे २६८८ मते घेऊन विजयी झाल्या. तर शिवसेनेच्या स्वाती मराठे यांना २५७६ मते मिळाली.

हे वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT