Latest

Nana Patekar : नानांनी लहान मुलीला शिकवलं झाडावर कसं चढायचं (video)

अनुराधा कोरवी

पुढारी आनलाईन डेस्क : मराठी अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) याच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले असल्याचे ते चर्चेत आले होते. यानंतर मुख्यमंत्री बाप्पांच्या दर्शनासोबत नानांनी स्वत: चुलीवर बनवलेलं पिठलं आणि भाकरीचा आस्वाद त्यांनी यावेळी घेतला. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मानही करण्यात आला होता. याच दरम्यान नाना पाटेकर पुन्हा एकदा त्याच्या आजोबा- नातीचं बॉन्डिंगने चर्चेत आले आहेत.

कोरोनानंतर दोन वर्षांनी यावर्षीचा गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. याच दरम्यान पुणे दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. पाटेकर यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत त्याच्या चुलीवर बनवलेलं पिठलं आणि भाकरीचा आस्वाद त्यांनी यावेळी घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कारमधून उतरून नाना पाटेकर यांची गळाभेट घेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओतून नाना पाटेकर चर्चेत आले होते. यानंतर नुकतेच ते त्याच्या नातीला आंब्याच्या झाडावर चढवतानाचा एक आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शेअर झालेल्या व्हिडिओत नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी पांढऱ्या रंगाच्या धोतर आणि फूल शर्टमध्ये तर त्याची नातं आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. यावेळी नाना तिच्या नांतीला झाडावर चढवताना दिसतात. यावेळी त्याची नातं 'मला घरा' असे म्हणते, यावर मजेत नाना नुसतं पडशील आणखी काय होणार आहे असे म्हणतात. यामुळे आजूबाजूला असणारे सर्वजण जोरात हसतात. याच दरम्यान नाना आम्हच्या झाडाला फळे कशी लागली आहेत ते बघ असेही नातीला म्हणतात. यावरून नाना पाटेकर बागेतील झाडाची देखभाल करताना दिसतात. यावेळी नाना आणि त्याच्या नातीचं खूपच चागलं बॉन्डिग पाहायला मिळालं आहे.

हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत असून सोशल मीडियावरील चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. यात एका युजर्सने 'रमणीय ?❤️', 'Mast nana', 'खुप छान ???❤', 'Beautiful, Simplicity❤️❤️', 'खूप विनम्र आणि अतिशय नम्र व्यक्ती ?', 'साधे जीवन आणि उच्च विचारसरणी'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. मुख्यमंत्र्याच्या भेटीदरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT