अमिताभ यांच्याविषयी तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?  | पुढारी

अमिताभ यांच्याविषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहेत का? 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

११ ऑक्‍टोबर १९४२ रोजी अलाहाबाद येथे अमिताभ बच्‍चन यांचा जन्‍म झाला. प्रख्‍यात कवी हरिवंशराय बच्‍चन हे त्‍यांचे वडील. अमिताभ यांचे खर नाव श्रीवास्‍तव; पण, वडिलांनी कवी म्‍हणून स्‍वीकारलेले बच्‍चन हेच नावे त्‍यांना मिळाले.  

भारतीय सिनेसृष्‍टीतील पारंरिक अभिनेत्‍याची सगळी परिमाणे बदलून टाकत ७० मि.मी. पडदा अमिताभ बच्‍चन यांनी एकट्‍यांनी व्‍यापला. १९७३ साली रिलीज झालेला चित्रपट जंजीरमधील ‘ये पुलिस स्‍टेशन है, तुम्‍हारे बाप का घर नही,’ असे डोळ्‍यात डोळे भिडवून खलनायकाच्‍या खूर्चीला लाथ मारणार्‍या अमिताभ यांनी लाखो लोकांच्‍या मनाचा ताबा घेतला. छोट्‍या पडद्‍यावर ‘देवी और सज्‍जनो आज हम खेलते है…कौन बनेगा करोडपती’ असे म्‍हणत सन्‍मानपूर्वक स्‍पर्धकाला खुर्ची देतात, तेव्‍हाही त्‍यांनी घेतलला ताबा सुटलेला नाही. अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍या आयुष्‍यातील या वेचक गोष्टींविषयी जाणून घेऊया.

Actors who played role of police officer in bollywood films simmba singham  dabang prm | खाकी वर्दी में पर्दे पर नजर आने वाले बॉलीवुड स्टार्स |  bollywood - News in Hindi -

– के. ए. अब्‍बास दिग्‍दर्शित ‘सात हिंदुस्‍तानी’ (१९६९) हा अमिताभ बच्‍चन यांचा पहिला चित्रपट; पण, जंजीर या चित्रपटाने त्‍यांना खरी ओळख मिळवून दिली. 

– सुरुवातीला त्‍यांचे चित्रपट फ्‍लॉप होत असताना निर्माता-दिग्‍दर्शक कुंदनकुमार यांनी चार रिळांच्‍या चित्रीकरणानंतर ‘दुनिया का मेला’मधून त्‍यांना काढून संजय खानला घेतले. मजेशीर म्‍हणजे या चित्रपटात रेखा अभिनेत्री होती. 

– अमिताभ यांचे काही चित्रपट फ्‍लॉप ठरले. तर अनेक सुपरहिट ठरले. यार मेरी जिंदगी हा त्‍यांचा चित्रपट तब्‍बल २१ वर्षांनी पूर्ण झाला. रुद्र, शिनाख्‍त, बंधुआ, टायगर, रिश्‍ता, सरफरोश असे चित्रपट चालले नाहीत. 

– मनमोहन देसाई दिग्‍दर्शित कुलीच्‍या सेटवर बेंगलोर येथे २६ जुलै १९८२ रोजी मारहाण दृश्‍यात पुनीत इस्‍सारचा ठोसा चुकवण्‍याच्‍या प्रयत्‍नात अमिताभ यांच्‍या पोटात टेबलाचा लागलेला कोपरा जीवघेणा ठरला. ते बरे व्‍हावेत म्‍हणून देशभरातीलच नव्‍हे तर परदेशातीलही चाहत्‍यांनीही प्रार्थना केल्‍या. 

– १९८४ साली आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करण्‍यासाठी अमिताभ यांनी राजकारणात टाकलेले पाऊल वादग्रस्‍त ठरले. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्‍यांनी समाजवादी पक्षाचे मुरब्‍बी उमेदवार हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्‍हणून लोकसभेत प्रवेश केला. 

– खुदा गवाह (१९९२) नंतर ते काही काळ चित्रपटापासून दूर राहिले. 

The Amitabh Bachchan family & their super luxurious cars: Rolls Royces to  Bentleys

– अमिताभ यांना कारचे प्रचंड वेड आहे. त्‍यांच्‍या ताफ्‍यात लेक्‍स, रॉल्‍स रॉईस, बीएमडब्‍ल्‍यू, मर्सिडीज या कारचा समावेश आहे. पांढर्‍या रंगाची रॉल्‍स रॉईस फँटम ही गाडी निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी अमिताभ यांना ‘एकलव्‍य’ चित्रपटातील शानदार कामासाठी गिफ्‍ट केली होती.

– अमिताभ बच्‍चन यांचे पहिले प्रेम जया बच्‍चन किंवा रेखा नाही, तर एका ब्रिटीश कंपनीत काम करणारी मराठी मुलगी होती. दोघे कोलकात्‍यात नोकरीला होते. त्‍यावेळी अमिताभ यांना १५०० रुपये, तर त्‍या मुलीला ४०० रुपये पगार होता. बिग बींना तिच्‍याशी विवाहदेखील करायचा होता, पण ते शक्‍य झालं नाही. त्‍यामुळे बिग बी नोकरी सोडून मुंबईला आले. 

Film History Pics su Twitter: "AGNEEPATH released today in 1990. Mukul  Anand's film, produced by Yash Johar - Amitabh Bachchan won the National  Award as Vijay Dinanath Chauhan, Danny D. as Kancha

– हिंदीमध्‍ये अमिताभ यांच्‍या डॉन, अग्‍निपथ, जंजीर या गाजलेल्‍या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आले. दक्षिणेत दीवार, नसीब, अमर अकबर अँथनी, जंजीर, कस्‍मे वादे या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आले. या प्रत्‍येक चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ यांची भूमिका साकारलेली होती. अमिताभ यांच्‍या २० चित्रपटांत त्‍यांचे नाव विजय असे आहे. अमित हे सर्वाधिक वेळा वापरले गेलेले नाव आहे. 

 – डॉन, दी ग्रेट गॅम्‍बलर, आखरी रास्‍ता, देशप्रेम, अदालत, सत्ते पे सत्ता, कस्‍मे वादे अशा चित्रपटांतूत त्‍यांनी दुहेरी भूमिका केल्‍या आहेत. महान चित्रपटांत तिहेरी भूमिका होती. 

– अमिताभ यांनी चित्रपटात गाणीही गायली आहेत. ‘मि. नटवरलाल’मधील ‘मेरे पास आवो मेरे दोस्‍तो,’ ‘लावारीस’मधील मेरे अंगने मे, ‘सिलसिला’मधील ‘निला आसमा सो गया’ आणि ‘रंग बरसे’ ही काही उदाहरणे आहेत. 

– कारकिर्दीच्‍या उत्तरार्धात अमिताभ यांना अनेक चांगल्‍या भूमिका मिळाल्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी गेटअपही बदलला. पा चित्रपटातील आजारग्रस्‍त लहान मुलाची भूमिका हे सर्वोत्तम उदाहरण. 

– उतारवयात अमिताभ यांच्‍या बागबान, बाबू, आँखे, पीकू, पिंक, वजीर, शमिताभ या चित्रपटातही वेगळ्‍या भूमिका केल्‍या. 

– त्‍यांनी अनेक चित्रपटात पोलिस अधिकार्‍याची भूमिका केली. त्‍यांना अँग्री यंग मॅन हा किताब मिळवून देणार्‍या ‘जंजीर’ या चित्रपटातही ते पोलिस अधिकारी होते. त्‍याशिवाय, दोस्‍ताना, दी ग्रेट गॅम्‍बलर, अकेला, आखरी रास्‍ता अशा अनेक चित्रपटात ते पोलिस अधिकारी होते. 

47YearsofAnand: When Rajesh Khanna and Amitabh Bachchan lit up the screens  with their stellar performances | Bollywood News – India TV

– राजेश खन्‍ना, संजीवकुमार अशा अनेक दिग्‍गजांसोबत अमिताभ यांनी काम केले. शक्‍ती या चित्रपटातील दिलीपकुमार यांच्‍यासोबत त्‍यांची अभिनयाची जुगलबंदी रंगली. 

– कौन बनेगा करोडपती मधून अमिताभ यांनी २००० साली छोट्‍या पडद्‍यावर पदार्पण केले. यंदा या शोचे १० वे सीझन सुरू आहे. 

– आवाज ही अमिताभ यांची आणखी एक खासीयत. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्‍टारची वैशिष्‍ट्‍ये बनली. परंतु, सुरुवातीला यामुळेच त्‍यांची हेटाळणी झाली. 

– अमिताभ बच्‍चन कार्पोरेशन या लिमिटेड संस्‍थेद्‍वारे आणि स्‍वतंत्रपणे त्‍यांनी चित्रपटांची निर्मिती केली. त्‍यात तेरे मेरे सपने, मृत्‍युदंड, उल्‍लासम, सात रंग के सपने, फॅमिली, पा, विहीर, अंतरमहाल, अक्‍स, विरुध्‍द, सप्‍तबदी, बुढ्‍ढा होगा तेरा बाप, मेजरसाब, शमिताभ या चित्रपटांची निर्मिती केली. 

– अमिताभ यांना स्‍वत:लाचड विनोदाची जबरदस्‍त जाण असल्‍याने आणि अमर अकबर ॲन्‍थोनी मध्‍ये आरशासमोर त्‍यांनी केलेल्‍या धमाल प्रसंगानंतर त्‍यांना वारंवार विनाेदी प्रसंग दिले जाऊ लागले. शशी कपूर, विनोद खन्‍ना यांच्‍यासोबत त्‍यांची जमलेली जोडी व त्‍यांनी एकत्र केलेले चित्रपट हाही चर्चेचा विषय बनत असे. 

Why is Vinod Khanna rated as number 2 if people said he was better than Amitabh  Bachchan? Doesn't it actually mean Amitabh was better and more versatile? -  Quora

– अनेक चित्रपटांत त्‍यांचा आवज वापरण्‍यात आला आहे. १९७७ रोजी सत्‍यजित राय यांनी शतरंज की कहानी चित्रपटात अमिताभ यांचा आवाज वापरण्‍यात आलाय. महाभारत मालिका, जोधा अकबर, लगान, बालिका वधू, तेरे मेरे सपने, परिणीता, कहानी, क्रिश ३, कोचड्‍यान, द गाझी ॲटॅक हे चित्रपट आणि मालिकांचे कथन किंवा निवेदन केले आहे. 

– अलाहाबादमधील क्रीडा संकुल,, इटावा येथील सरकारी शाळा यांना अमिताभ यांचे नाव देण्‍यात आले आहे. अलाहाबादमधील एक रस्‍ताही त्‍यांच्‍या नावाने आहे. 

– अमिताभ यांना आतापर्यंत चार राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाले असून, हा एक विक्रमच आहे. अग्‍निपथ (२०००), ब्‍लॅक (२००५), पा (२००९), पिकू (२०१५) या चित्रपटांसाठी त्‍यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला आहे. 

– १९८४ साली पद्‍मश्री, २००१ साली पद्‍मभूषण तर २०१५ साली पद्‍मविभूषणने त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आलं आहे. २००७ साली फ्रान्‍स सरकारने त्‍यांना नाईट ऑफ दी लेजिओन हा सन्‍मान बहाल केला. आतापर्यंत २२० वेगवेगळे पुरस्‍कार, ७ वेगवेगळ्‍या विद्‍यापीठांनी डॉक्ट‍रेट देऊन त्‍यांचा सन्‍मान केला आहे. अमिताभ बच्‍चन यांचे खास वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे ते दोन्‍ही हातांनी लिहू शकतात. 

– ‘खुदा गवाह’च्‍या शूटिंगच्‍या वेळी अफगाणिस्‍तानच्‍या अध्‍यक्षांनी अमिताभ यांना वायुसेनेची खास सुरक्षा दिली होती. अफगाणमध्‍ये सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपट म्‍हणून ‘खुदा गवाह’ची नोंद आहे. 

Big B, Sridevi might come together for Khuda Gawah sequel - Movies News

– गाड्‍यांबरोबरच त्‍यांना घड्‍याळे जमा करण्‍याचा छंद आहे. लंडन आणि स्‍वित्‍झर्लंड ही त्‍यांची आवडती ठिकाणे आहेत. 

– अनेक हिट चित्रपट देणारे सुभाष घई आणि अमिताभ यांनी एकत्र एकही चित्रपट केलेला नाही. ‘देवा’ नावाच्‍या चित्रपटाची घोषाणा झाली, परंतु, चित्रपट आला नाही. 

– अमिताभ यांनी पहिली कविता १९८२ मध्‍ये रुग्‍णायलात असताना लिहिली. 

– बॉलिवूडमधील मेड फॉर इच अदर जोड्‍यांमध्‍ये अमिताभ आणि जया बच्‍चन या जोडीचे नाव न चुकता घेतले जाते. पडद्‍यावर या जोडीने इकत्र काम केले. ३ जून १९७३ रोजी खर्‍या आयुष्‍यातही त्‍यांनी एकमेकांची साथ देण्‍याचा निर्णय घेतला. 

– घरातील बेडरूम ही त्‍यांची आवडती जागा. येथे शांतपणे बसून त्‍यांना वाचन करणे आवडते. ते कधीही चहा, कॉफी घेत नाहीत. मद्‍यपी व्‍यक्‍तीचा उत्तम अभिनय करणारे अमिताभ दारूला हात देखील लावत नाहीत. 

Амитабх Баччан | Old film stars, Bollywood cinema, Vintage bollywood

– ते फारसे चिडत नाहीत. रस्‍त्‍यावरची भुर्जी, भाजलेले कणीस त्‍यांना आवडते. हिंदीशिवाय ते मराठी, बंगाली, पंजाबी भाषा बोलू शकतात. जर्मन, फ्रेंच, रशियन आणि इटालियन या विदेशी भाषाही त्‍यांनी शिकल्‍या आहेत. 

– ६ फूट २ इंच असलेले अमिताभ बॉलिवूडमधले सर्वांत उंच अभिनेते आहेत. मुंबईत स्‍ट्रगल करताना राहण्‍यासाठी जागा नसल्‍याने त्‍यांनी अनेक रात्री मरीन ड्राईव्‍हवर काढल्‍या. 

– वृत्त निवेदक म्‍हणून त्‍यांनी आकाशवाणीत अर्ज केला, मात्र, आवाज चांगला नसल्‍याने त्‍यांना ही नोकरी मिळाली नाही. 

– लंडन येथे २०१२ मध्‍ये झालेल्‍या ऑलिम्‍पिकमध्‍ये मशाल धावकाचा मान त्‍यांना मिळाला होता.  

– बिग बींना बॉलिवूड हा शब्‍द आवडत नाही. ते नेहमी हिंदी फिल्‍म इंडस्‍ट्री या शब्‍दाचा वापर करतात. 

Amitabh Bachchan Ran To Waheeda Rehman With Juttis When She Was Shooting In  Desert Bare Feet - Filmibeat

– त्‍यांच्‍या मते, वहिदा रहमानच ही हिंदी सिनेसृष्‍टीतील सर्वांत सुदंर अभिनेत्री आहे. 

– लंडनच्‍या मादाम तुसाद संग्रहालयात २००१ मध्‍ये मेणाचा पुतळा उभारण्‍यात आला आहे. 

– रेखा, परवीन बॉबी आणि झीनत अमान या नायिकांनी बिग बींसोबत काम केले आहे. सायरा बानो (हेराफेरी, १९७६), मुमताज (बंधे हाथ, १९७३), नूतन (सौदागर, १९७३), रती अग्‍निहोत्री (कुली, १९८३) यांनी फक्‍त एकाच चित्रपटात अमिताभसमवेत काम केले आहे. 

– ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटामध्‍ये काम करताना त्‍यांनी लेन्‍सचा वापर केला होता. या लेन्‍स घालताना आणि काढताना त्‍यांना प्रचंड त्रास होत असे. 

Amitabh Bachchan - #Bollywood #Celebrities Who Have Their Wax Figure At  Madame Tussaud's London | Madame tussauds, Tussauds, Bollywood stars


 

Back to top button