Latest

Whale fish : नागपुरात तस्करी होणारी कोट्यवधीची व्हेल माशाची उलटी वनविभागाने पकडली

अविनाश सुतार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात वनविभागाने कोट्यवधी रुपये किमतींची व्हेल माशाची  (Whale fish) उलटी अर्थात अंबरग्रीस जप्त केले. याप्रकरणी चार तस्करांना वनविभागाने अटक केली आहे. व्हेल माशाची उलटीची तस्करी पकडण्यासाठी वनविभागाने रचलेला सापळा आज ( दि १९)  यशस्वी झाला. पकडलेल्या अंबरग्रीसची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. अंबरग्रीस प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात व्हेल माशाची (Whale fish)उलटीची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने सापळा रचून शहरातल्या गणेशपेठ परिसरातून चार जणांना ताब्यात घेतले. अरुण गुंजाळ, पवन गजघाटे, राहुल दुपारे आणि प्रफुल्ल मतलाने या चाैघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुर्मिळ असे अंबरग्रीस जप्त केले आहे. आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करांची चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता आहे. नागपुरातील ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई असून, या मागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.

Whale fish : दुर्मीळ अंबरग्रीस

अंबरग्रीस अतिशय दुर्मिळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत कोट्यवधीत आहे. याला समुद्रातील सोने किंवा तरंगणारे सोने असेही म्हणतात. महागडे परफ्युम्स आणि औषधांसाठी अंबरग्रीसचा खास करून वापर करण्यात येतो. अंबरग्रीस परफ्युमचा सुगंध हवेत उन्हापासून रोखण्याचे काम करतो. शरीरातून बाहेर पडल्यानंतर उलटी समुद्राच्या पाण्यात तरंगत असते सूर्यकिरण आणि समुद्रातील क्षार यांच्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन याचे रूपांतर अंबरग्रीसमध्ये होते.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT