file photo 
Latest

धक्‍कादायक : नागपुरात अंत्‍यसंस्‍कारावेळी डिझेलचा उडाला भडका; तीन जण भाजून जखमी, दोघांचा मृत्‍यू

निलेश पोतदार

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा : पार्थिवावर अंतिम संस्‍कार सुरू असताना अचानक जवळच असलेल्‍या डिझेलच्या डब्‍यावर पेटत्‍या लाकडाचा निखारा पडल्‍याने उडालेल्‍या भडक्‍यात दोन जणांचा मृत्‍यू झाला. ही दुर्दवी घटना नागपुरात घडली. पार्थिव व्यवस्थित जळावे यासाठी काहीजण सरणावर डिझेल फेकत होते यावेळी ही दुर्घटना घडली. यावेळी जवळ उभ्‍या असलेल्‍या लोकांनी बाजूला पळ काढला.
या विषयी अधिक माहिती अशी की, पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी सरण रचण्यात आले. यावेळी हे सरण पेटवताना त्‍यावर डिझेल ओतण्यात आले होते. यावेळी सरण पेटवताना अचानक आगीचा भडका उडाला. यात अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिनजण भाजले गेले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली.

दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी या घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम इथे एका स्थानिक रहिवाशाचा अपघाती मृत्यू झाला होता. सिद्धार्थ अंतुजी हुमने असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम इथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते. दरम्यान सरण पेटवत असताना डिझेलचा भडका उडाला. यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर बुधाजी खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघं गंभीर जखमी झाले. तिघांनाही भरपूर भाजलेले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचादारम्यानच यातील दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पार्थिव सरणावर ठेवून अग्नी दिल्यानंतर सरणावरील पेटत्या लाकडाचा उडालेला निखारा जवळच असलेल्या डिझेलच्या डबक्‍यावर जाउन पडला आणि त्या डिझेलचा भडका उडाला. यात अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांपैकी तिघे भाजल्यानंतर गंभीर जखमी झाले होते. भाजलेले तिघेही खलासी लाइन, नागसेननगर येथील रहिवासी आहेत.
पार्थिव व्यवस्थित जळावे यासाठी काहीजण सरणावर डिझेल फेकत होते. या घटनेनंतर इतरांनी लगेच तिघांच्या अंगावरील कपड्यांना लागलेली आग विझवली. त्यांना कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिघांवर प्रथमोपचार केल्यानंतर दिलीप गजभिये व सुधाकर खोब्रागडे यांना नागपूर शहरातील मेयो रुग्णालयात, तर सुधीर डोंगरे यांना कामठी शहरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. माहिती मिळताच कामठी (नवीन) पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT