नागपूर, पुढारी ऑनलाईन : व्हाॅट्सॲप स्टेटसला उचकवणारी काॅमेंट केल्यामुळे समीर खान चवताळला, त्याने सात जणांचा घेऊन एका लग्नाच्या वरातीत घुसला. तिथं काॅमेंट्स करणाऱ्या शाहबाज खानला मारहाण केली आणि एका अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला, असे वृत्त हिंदी वृत्तवाहिनीने दिलं आहे. ही घटना नागपूरमधील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संबंधित सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, "मोमीनपुऱ्यामध्ये समीर खानचा लहान भाऊ रिजवान राहतो. या रिजवानने आपल्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर आपल्या भावाचा म्हणजेच समीर फोटो ठेवला. तो पाहून शाहबाज खानने काॅमेंट केली. त्यानंतर समीरने शाहबाज खानला विचारणा केली. त्यावर शाहबाज खान याने उत्तर दिले की, मै यहा का बादशहा हूॅं, मै शादी के बारात में हूॅं", या उत्तरावर समीरची गॅंग शाहबाज खानला मारण्यासाठी लग्नाच्या वरातीत गेली.
समीर खानच्या गॅंगमध्ये अल्तमस अन्सारी, अनवर अन्सारी, आरिफ अन्सारी, मोहमंद कैफ अन्सारी (रा. संघर्षनगर) आणि दोन अल्पवयीन मुलं होती. ही गॅंग शाहबाज खानला मारण्यासाठी वरतीत घुसली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या खजानासमोर ही गॅंग गेली. या ठिकाणी फिरोज खानच्या मोठ्या भावाचा मुलगा अफताब खानच्या लग्नाची वरात जात होती. या वरातीत आरोपींनी पिस्तुली काढल्या आणि दोन राऊंट हवेत फायर केले. त्याचबरोबर फिरोज खानचा पुतण्या अशरफ खानच्या पायावर चाकूने वार केले.
व्हाॅट्सॲप स्टेट्सवर तु चुकीचे का बोललास, यावरून सात जणांना वरारीत राडा घातला. वरातीत दहशत निर्माण केली. एका अल्पवयीन तरुणाने चाकुने हल्ला केला. संतापलेल्या वराडातील लोकांना अल्तमस नावाच्या हल्लेखोराला पकडले आणि त्याला चोप दिला. यशोधरानगर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
पहा व्हिडिओ : नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानची सफर…मराठी भाषा गौरव दिन विशेष