Latest

IndiGo | नागपूर : इंडिगो विमान उतरताना इमर्जन्सी डोअर उघडणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: नागपूर ते मुंबई जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) विमानाचे आपत्कालीन दरवाजे (इमर्जन्सी डोअर) उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्याविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भांदवि 336 तसेच एअरक्राफ्ट कायदा 1937 अनुसार विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचे (6e 5274) विमान (IndiGo) मुंबईकडे 24 जानेवारी सकाळी 11.05 वाजता झेपावले. हे विमान मुंबई विमानतळावर 12.30 च्या सुमारास उतरत असताना विमानाचे आपात्कालीन दरवाजे कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निर्देश वैमानिकाला मिळाले. तातडीने यावरून कॅबिनमधील सहकर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता इमर्जन्सी गेटच्या हँडलचे कव्हर उघडण्यात आल्याचे निदर्शनास आले.

सुदैवाने ही घटना विमान उतरताना लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर या प्रवाशाविरुद्ध तक्रार देण्यात आली. वैमानिक, सहवैमानिक आणि सह प्रवाशांची बाजू ऐकून घेण्यात आल्यानंतर संबंधित प्रणव राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी देखील चेन्नई ते तिरुचिरापल्ली प्रवासादरम्यान अनवधानाने विमानाचे इमर्जन्सी एक्झिट डोअर उघडण्याचा प्रकार गतवर्षी डिसेंबर महिन्यात घडला होता. चुकीने का होईना इमर्जन्सी एक्झिट डोअर हवेत उघडल्यास इतर प्रवाशांच्या जीवाचे काय होणार ? या भीतीने सर्वांचीच पाचावर धारण बसली होती.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT