नागपूर: ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या | पुढारी

नागपूर: 'अंनिस'च्या पदाधिकाऱ्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आता त्यांच्या सहकाऱ्यांना देखील धमक्या येत असल्याची माहिती अंनिसचे पदाधिकारी हरीष देशमुख यांनी दिली. समितीच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना फोनवर धमक्या दिल्या जात असून, धमकी देणाऱ्यांचे आम्ही फोनवर प्रबोधन करीत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

आम्ही कुठल्याही धर्माविरोधात नसून धर्माच्या नावावर सुरु असलेल्या बुवाबाजी विरोधात आहोत. देशमुख म्हणाले की, अंनिस ही हिंदू धर्मविरोधी असल्याचे चित्र निर्माण करून लोकांच्या भावना भडविण्याचे काम सुरु आहे. संतापलेले लोक आम्हाला व कार्यकर्त्यांना फोन करून शिवीगाळ व धमक्या देत आहेत. सोशल मीडियावर आमची बदनामी देखील केली जात आहे.

अलिकडेच नागपूर शहर पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लिनचीट दिली असून, त्यांच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम झाल्याचे कुठेही दिसत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. श्याम मानव यांनी नागपुरात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना दिव्यशक्ती दाखविण्याचे आव्हान दिले होते. नागपुरात रेशीमबाग मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बागेश्वर सरकार यांनी अंनिसला रायपूरला येण्याचे आव्हान दिले. हा वाद अद्यापही सुरुच आहे.

हेही वाचा :  

Back to top button