बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या एनडीपीसी (NDPC) ने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्यन खानचा मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड कारागृहातच राहणार आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक स्टार्सकडून अनेक शाहरूख खानसह आर्यनला पाठिंबा देत आहेत. तर सध्या बिग बॉस स्पर्धक केआरके याने देखील आर्यनला पाठिंबा दिला आहे.
मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह आठजण सापडले होते. यानंतर त्याना सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीने जोरदार युक्तिवाद करताना त्याला जामीन देऊ नये अशी विनंती न्यायालयाकडे केली होती.
या प्रकरणी सलग दोन दिवस न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय २० ऑक्टोबरपर्यंत निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
याच दरम्यान माजी बिग बॉस स्पर्धक केआरके याने सोशल मीडियावर एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात त्याने एनसीबीने आर्यन खानला २० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात ठेवण्यात यशस्वी झाला असल्याचे म्हटले आहे. या कालावधीत आर्यनला नरक यातना भोगावे लागणार आहे. यामुळे आर्यनच्या जीवाला धोक्का आहे. आशा आहे की, आर्यन या असह्य त्रासातून लवकरच बाहेर पडेल. माझे सहकार्य त्याला नेहमीच लाभेल. असे म्हटले आहे.
याआधाही बिग बॉस स्पर्धक केआरकेने आर्यन खानच्या झालेल्या आरोपासह कार्यवाहीवर रोष व्यक्त केला होता.
एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर आर्यन खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली. न्यायालयाने प्रथम आर्यन खानला एनसीबी कोठडी आणि नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचलंत का?