भंडारा, पुढारी वृत्तसेवा : भंडारा शहरात तीनशे रूपयांच्या उधारीचे कारणावरून एकाचा खून करण्यात आला. ३०० रुपये परत देत नसल्याने लाकडी दांड्याने वार करुन एकाचा खून केला. ही घटना गुरुवारी चांदणी चौक येथील कुंभारटोली परिसरात उघडकीस आली. सतिश आनंदराव रामटेके (वय ४८) रा. राजगुरु वॉर्ड, भंडारा असे मृतकाचे नाव आहे. तर अमन अनिल सोनेकर (वय २४) रा. इंदिरा गांधी वॉर्ड भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश रामटेके यांनी अमन सोनेकर यांच्याकडून ३०० रुपये उधारी म्हणून घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी अमन वारंवार सतिशला बोलत होता. परंतु, सतिश पैसे परत करीत नव्हता. दरम्यान, गुरुवारी अमनने लाकडी दांड्याने सतिशच्या डोक्यावर वार केला. आणि यामध्ये सतिशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अमनवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद जगने करीत आहेत.
हेही वाचा