खोपोली पुढारी प्रतिनिधी: गुरुवारी (दि.१७) पुण्याहून मुंबई कडे जाण्यासाठी एका इर्टिका कार मध्ये आठ प्रवासी प्रवास करीत होते. एक्सप्रेस वे वरील ढेकू गावच्या हद्दीत आल्यावेळी भरधाव वेगात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला. आणि कारने अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या भयंकर अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
पाचजण ठार, चारजण गंभीर जखमी
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज पुण्याहून मुंबई कडे जाण्यासाठी प्रवासी वाहतूक करणारे फोरव्हीलर वाहने सेवा देत आहेत. प्रति मानसी दर आकारून ही वाहतूक सुरू आहे. ही सुविधा प्रवासी वर्गालाही परवडत असल्याने या प्रवासाला पसंती मिळत आहे. मात्र हाच प्रवास जीवघेणा ठरला आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ईर्टीका कार मध्ये चालक मच्छीन्द्र आंबोरे व आठ प्रवासी होते. सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईकडे जाण्यासाठी कार मधून प्रवास करत होते. सदर कार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावचे हद्दीत किलोमीटर 37.00 येथे आली असता चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की त्यामध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. असून चार जणांना गंभीर जखमी झाल्याने एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. त्यादरम्यान त्यातील एक जणांचा मृत्यू झाला आहे. चालक आणि इतर दोघाजणांवर उपचार सुरू आहेत.
रात्री 11वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे. अपघातस्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले दाखल झाले आहेत. अपघाताची पुढील चौकशी सुरू केली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे
१) अब्दुल रहमान खान, ( वय. ३२ वर्षे) घाटकोपर
२) अनिल सुनिल सानप
३) वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी
४) राहुल कुमार पांडे (वय-३० वर्षे) फ्लॅट न.-६०५, रिद्धेश्वर हौ. सो., कामोठे. नवी मुंबई
५) आशुतोष नवनाथ गांडेकर (वय. २३ वर्षे)
५, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई
गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे
१) मच्छिंद्र आंबोरे (वय ३८ वर्ष)(चालक)
२) अमीरउल्ला चौधरी
३) दिपक खैराल
१) अस्फीया रईस चौधरी, (वय. २५ वर्षे.) कुर्ला, मुंबई
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.