Latest

Congress Chief Nana Patole : काँग्रेसमध्येही फिरणार भाकरी! संघटनात्मक फेरबदलांची हालचाल सुरु; नाना पटोले

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : हे वर्ष निवडणुकींचे असल्याने आता प्रभारींची नेमणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आम्ही मोठे बदल करणार आहोत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Chief Nana Patole) यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावर अजून चर्चा करण्याचं कारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाच्या मंत्र्यांविषयी नाराजी संदर्भात ते म्हणाले, मंत्रालयामधील परिस्थिती पाहिल्यास जनतेला लुटण्यासाठीच मंत्री बसले आहेत, ही भयंकर परिस्थिती आहे. यामुळेच ईडीच्या सरकारमध्ये धूसफूस सुरू आहे, याचा कधीही स्फोट होऊ शकतो. विरोधकांना धमकी प्रकरण सरकारने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे लोकांना भडकवण्याचं काम भाजप करीत आहे. यामधून विरोधकांना टार्गेट करुन धमकवता कसं येईल, हे सरकार बघत आहे. मुळात न्यायालयाने तुम्हाला नपुंसक म्हटलं आहे. तुम्हाला जर राज्यकारभार नसेल जमत तर माघार घ्यावी असा टोला देखील पटोले यांनी लगावला आहे.(Congress Chief Nana Patole)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्याबाबत प्रश्न विचारले असता पटोले म्हणाले, २०१४ मध्ये किती आश्वासनांची पूर्तता केली हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लोकांना सांगावं लागेल. जनतेचा भ्रमनिरास झाला असून जूमले आता चालणार नाहीत, त्यामुळे सभा कितीही झाल्या तरी त्याचा काही परिणाम होणार नाही असा दावा पटोले यांनी केला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT