पुढारी ऑनलाईन डेस्क : सासु-सून मतभेद ही सामन्य बाब आहे. जुन्या आणि नव्या पिढीतील वर्तनावरुनही काही वाद होताना दिसतात. मात्र या वादावर सामजस्याने तोडगा निघाला नाही तर याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडले. येथील सासू-सुनेमधील वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. सासूने पोलिस स्टेशन गाठत 'माझी सून माझ्या पाया पडत नाही, तिच्या या वर्तनामुळे मला नातेवाईकांसमोर अनेकवेळा मान खाली घालावी लागली आहे', अशी तक्रार सासूने केली. ही तक्रार ऐकून पोलिसही काही वेळ हैराण झाले.
संबंधित प्रकरणातील सून बी.टेक आहे तर सासू शिक्षिका आहे. सून दररोज पाया पडत नाही, अशी सासूची तक्रार होती. हा वाद सिकंदरा पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. येथील समुपदेशन केंद्रातील कर्मचार्यांनी रविवारी या प्रकरणी दोन्हीकडील नातेवाईकांना बोलवले. यावेळी सून पाया पडत नाही. त्यामुळे मला अनेकवेळा नातेवाईकांसमोर अपमानित व्हावे लागले आहे, अशी तक्रार सासूने केली. यावर उत्तर देताना सूनेने आपली बाजू मांडली. मी सासू-सासरे यांचा मनापासून आदर करते. दररोज पाया पडलेच पाहिजे असे नाही, असे तिने सांगितले.
सूनेने दररोज पाया पडले पाहिजे, असा सासूचा आग्रह होता. मात्र मी सासू आणि सासरे यांचा मनापासून आदर करते, प्रत्येक गोष्टीचे पालन करते, फक्त पाया पडण्याच्या कारणावरुन मतभेद वाढले आणि याला कंटाळून अखेर सून माहेरी गेली आहे. अखेर हा वाद पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर रविवारी दोन्ही पक्षांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. दोन्ही बाजूंना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण काही निष्पन्न झाले नाही. याप्रकरणी पुढील तारीख देण्यात आली आहे, अशी माहिती आग्रा येथील समुपदेशक केंद्राचे अधिकारी अमित गौर यांनी दिली आहे.
हेही वाचा :