Latest

CM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा लोकप्रिय मुख्यमंत्री, योगींचे नाव यादीच्या बाहेर

backup backup

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : मागच्या कित्येक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार घरातून साभांळत आहेत. मागील दोन वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने हाकल्याने देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचा तिसऱ्यांदा देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. (CM Uddhav Thackeray)

इंडिया टुडे माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मागच्या वेळी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळवलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव यादीच्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे.

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे चौथ्या स्थानांवर

इंडिया टुडेकडून देशातील प्रत्येक राज्यात हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ४३ टक्क्यांहून चांगली कामगिरी करणाऱ्या ९ मुखमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पहिल्या क्रमांकाची पसंदी मिळाली आहे. पटनायक यांच्या कामावर ७१.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

तर दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटनायक यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. त्यांच्या कामगिरीवर ६९.९ टक्के जनता समाधानी आहे. तिसऱ्या नंबरवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. त्यांच्या कारभारावर ६७.५ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागतो. ६१.८ टक्के लोक त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल सहाव्या स्थानी

केरळचे मुख्यमंत्री (६१.६ टक्के) यादीत पाचव्या, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (५७.९ टक्के) सहाव्या स्थानी आहेत. ९ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री आहे. हेमंत विस्व सर्मा सातव्या क्रमांकावर आहेत. आसाममधील ५६.६ टक्के जनतेनं त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (५१.४ टक्के), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (४४.९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT