कोल्हापुरातील आरसी गँगमधील दहा गुंडांवर मोका कारवाई करण्यात आलीय. (Kolhapur Crime) खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, वसुली, अपहरण, दरोडासह, बेकायदा शस्त्र कब्जात बाळगून दहशत माजवणाऱ्या आरसी गँगविरोधात कारवाई झालीय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या आरसी गॅंगमधील मोक्यासह १० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत ( 'मोक्का' ) कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यामध्ये रवी शिंदे, प्रदीप कदम, संदीप गायकवाड, जावेद सय्यद, सागर जाधव, प्रकाश कांबळे अक्षय उर्फ आकाश कदम, अजय माने, योगेश पाटील, विकी माटुंगा यांचा समावेश आहे. गॅंगमधील मोरक्यासह साथीदारांविरोधात कोल्हापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
महिन्यापूर्वी या टोळीने प्रतिस्पर्धी तुहीचा मोरक्या अमोल भास्कर याचा शहरात थरारक पाठलाग करून हत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात खळबळ माजली होती. आरसी गॅंगमधील एकाच वेळी १० जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलीय.