Mohammed Shami’s ex-wife 
Latest

Mohammed Shami’s ex-wife : जगभर कौतुक मात्र, घटस्फोटीत पत्नी मोहम्मद शमीच्या विरोधात; म्हणाली, ‘शमीला माझ्या शुभेच्छा नाहीत’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने विश्वचषकात आत्तापर्यंत आक्रमक मारा करत आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. (Mohammed Shami's ex-wife) शमीच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने २ सामन्यात दिमाखदार विजय मिळवला आहे. त्याने विश्वचषकातील ४ सामन्यात 7.00 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या आहेत. या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा तो चौथा गोलंदाज आहे. शमीच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. मात्र, मोहम्मद शमीची घटस्फोटीत पत्नी त्याच्या विरोधात आहे. शमीची पत्नी हसीन जहान हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत दिली तिने शमीला विरोध दर्शवला आहे. (Mohammed Shami's ex-wife)

हसनी जहान म्हणाली, "मी भारतीय आहे. या नात्याने टीम इंडियाचा विजय व्हावा, असे वाटते. मी क्रिकेट पाहत नाही, त्यामुळे मी क्रिकेट फॅन नाही. क्रिकेटमधील हे सर्व माझ्या समजण्याच्या पलीकडचे आहे. मला काहीच कळत नाही. जर तो चांगली कामगिरी करत असेल, तर त्याचे संघातील स्थान अबाधित राहिलं. जर तो संघात राहिला आणि चांगली कमाई केली तर, आमचे भविष्य सुरक्षित राहिल. मी टीम इंडियाला शुभेच्छा देईल, पण त्याला नाही." (Mohammed Shami's ex-wife)

हसीन जहानने केले होते शमीवर गंभीर आरोप (Mohammed Shami's ex-wife)

हसीन जहानने शमीवर घरगुती हिंसाचार, इतर महिलांसोबत संबंध असे गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी, वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच हसीनने म्हशीसोबतचा फोटो शेअर करताना शमीविरोधात अपशब्द वापरले होते. हसीन जहान आणि मोहम्मद शमी सध्या वेगळे राहतात. (Mohammed Shami's ex-wife)

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT