Latest

Mohammad Siraj New Record : मोहम्मद सिराजने गाठले नवे शिखर! केला ‘हा’ पराक्रम

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammad Siraj New Record : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर आपल्या करीयरमधील नवे शिखर पादाक्रांत केले आहे. विशेष बाब म्हणजे त्याच्या जवळपास जगातील एकही गोलंदाज नाही. गुरुवारच्या सामन्यात सिराजने पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेची पहिली विकेट घेत त्यांना बॅकफूटवर ढकलले. यासह तो पॉवरप्लेचा मास्टर बॉलर ठरला आहे.

सिराजच्या वन डे पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स

श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि नुवानिडू फर्नांडो यांनी आघाडी घेतली. पण सिराजने (Mohammad Siraj) त्यांना खिंडीत गाठून त्यांना सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिला धक्का दिला. यावेळी लंकेची धावसंख्या 29 होती. सिराजने अविष्काचा (20) अडसर दूर करत संघाला पहिले यश मिळवून दिले. याचबरोबर 2022 पासून ते आतापर्यंत सिराज वन डे सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये 19 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आहे, ज्याच्या नावावर पॉवरप्लेमध्ये दहा विकेट्स आहेत. सिराज दुसऱ्या गोलंदाजाच्या किती पुढे आहे, हे या आकडेवारीवरून समजू शकते. (Mohammad Siraj New Record)

सिराजची शानदार प्रदर्शन (Mohammad Siraj New Record)

सिराजने (Mohammad Siraj) मालिकेतील पहिल्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली. बाकीच्या गोलंदाजांची दमछाक होत असताना, सिराजने अतिशय किफायतशीर मारा केला. त्याने मालिकेतील पहिल्या सामन्यात सात षटकात 30 धावा देत दोन विकेट घेतल्या. तर दुस-या वन डेतही त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराज सतत भारतीय संघाचा भाग आहे आणि चांगले प्रदर्शन करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT