दहीहंडी उत्सव 
Latest

दहीहंडीसाठी मनसेची चिलखत योजना; गोविंदांना मिळणार सुरक्षा कवच

Shambhuraj Pachindre

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा; दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दहीहंडी दिवशी उत्सव साजरा करताना म्हणजे हंडी फोडतेवेळी नवी मुंबईतल्या अपघातग्रस्त होणाऱ्या गोविदांना मनसेकडून 'सुरक्षा कवच' देऊ केले आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या १ हजार गोविंदांचा १०० कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूमुखीही पडतात. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी मनसेने गोविंदासाठी 'विमा सुरक्षा कवच' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील विम्याची मुदत १९ ऑगस्टचा पूर्ण दिवस असेल. सुरक्षा कवच' योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असे आवाहन मनसे नवीमुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही गजानन काळे यांनी स्पष्ट केले. या योजनेनुसार गोविंदास अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबियांना १० लाख रुपये, कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास १० लाख रुपये, अपघातामुळे रुग्णालयातील खर्च १ लाख रुपये असे विमा सुरक्षा कवच मनसेच्या वतीने मिळणार आहे. या योजनेचा नवी मुंबईतील गोविंदांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT